श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी.

मुंबई : - दि. 20 :  कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभागआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्रालयमुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने गृह विभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा.

दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादीचे  किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिकसांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.

मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधाकेवल नेटवर्कवेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.

श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी. मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसनआरोग्यपर्यावरण. वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिकापोलीस प्रशासनस्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष  सण सुरु  होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.