शेतकरी गटाने कृषी अवजारे योजनेचा लाभ घ्यावा.

गडचिरोली : - दि.30रखेडा- मानव विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकरी गटांना विविध उपकरणे उपलब्ध करूनदेण्याची योजना आहे कुरखेडा तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनीशेतकरी उत्पादक कंपनी यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुरखेडा तथा निवड समिती सचिव कु.सुरभी बाविस्कर यांनी केले आहे.

सन-2020-21 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी गटांना विविध उपकरणेउपलब्ध करून देण्याचे योजनेत राईस डी हासकिंग मशीन,भात झोडणी यंत्रबहुपीक टोकण यंत्र तथा भाजीपाला रिजर व कोळपे ताडपत्री पॅकिंगसहस्वयंरोजगार किटहस्त चलित कडबा कट अडकित्ता इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता कुरखेडा तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे.तरी तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनीशेतकरी कंपन्यांनीमहिला शेतकरी बचत गटांनीसेंद्रिय शेतीबचत गट यांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 12 मे 2021 पर्यंत तालुका कृषी अधिकारी, कार्यालय कुरखेडा यांच्याकडे सादर करावे.
          

या योजनेत राईस डी हासकींगभात झाडणी यंत्रबहुपीक टोकण यंत्र तथा भाजीपाला रिजर व कोळपेताडपत्री पॅकिंगसह ,स्वयंरोजगार किट हस्त चलित कडबा कट अडकित्ता इत्यादी शेती अवजारे चा समावेश आहे. या योजनेकरिता 90% अनुदान देण्याची योजना असून 10% शेतकरी गटाचे लाभार्थी हिस्सा असेल. अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालय ,कुरखेडा येथे उपलब्ध आहे.


ही योजना केवळ अनुसूचित जमातीच्या गटाकरिता आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नोंदणीकृत
शेतकरी गटांनी घेण्याचे आवाहन निवड समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी,कुरखेडा
क.सुरभी बाविस्कर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.