गडचिरोलीत कोरोना रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण रणनिती, कोविड नियंत्रण कक्षासह, जबाबदाऱ्या व कामांचे वाटप - जिल्हाधिकारी दीपक सिंगला

मृत्यूदर व रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश.

गडचिरोली : - दि.22: 'मिशन ब्रेक द चैनमोहिमअंतर्गत गडचिरोली जिल्हयात प्रशासनामार्फत कोरोना रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण रणनिती तयार करण्यात आली आहे. जिल्हयातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व कोरोनामूळे होणारे मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा देण्याच्या पध्दतीकामांचे वाटप व औषधोपचार ठिकाण याबाबतचे लेखी आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी ते डॉक्टरनर्स वार्ड बॉयड्रायव्हर अशा प्रत्येक स्तरावरील कोरोना योध्दयांसाठी त्यांच्या त्यांच्या कामात सुसूत्रीपणा येण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. तसेच जिल्हस्तरावरती व इतर 11 तालुक्यांमध्ये पूर्णवेळ 24x7 असा कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नॅशनल अर्ली वॉर्निग स्कोर (News2) द्वारे रुग्णावर कशाप्रकारे व कोणत्या ठिकाणी उचचार केले जातील याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. सदर गुणांकानूसार प्रत्येक रुग्णाला गृहविलगीकरणकोविड केअर सेंटरकिंवा जिल्हा रुग्णालय यापैकी एका ठिकाणी उपचारासाठी पाठविले जाईल. यामुळे गरजू रुग्णांना सोप्या पध्दतीने बेड उपलब्ध होईल व त्याच्यावर योग्य उपचार  होतील.

प्रत्येक रुग्णाची जबाबदारी:- जिल्हयात दवाखान्यात भरती केलेल्या कोरोना रुग्णांची जबाबदारी बेड क्रमांकानुसार त्या त्या ठिकाणच्या यंत्रणेवर दिली आहे. यामध्ये सर्व तालुक्यातील उपलब्ध बेड्स यांना क्रमांक देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनेवरील वेगवेगळे डॉक्टर्सनर्सवार्ड बॉयड्रायव्हर यांना दोन शिफ्ट मध्ये आपल्या रुग्णांची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये कोविड केअर सेंटर्सडेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटर्सडिस्ट्रीक्ट कोविड हॉस्पीटल  (यामध्ये वार्डनिहाय) बेड्स प्रत्येक डॉक्टर्सच्या टीमला वाटप करुन देण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हास्तरावरील डिस्ट्रीक्ट कोविड हॉस्पीटलची क्षमता 417डेडिकेटेट कोविड सेंटर यामध्ये गडचिरोली धर्मशाळाअहेरीएटापल्लीसिरोंचाआरमोरीव कुरखेडा या ठिकाणीची समता 329 आहे. तर कोविड केअर सेंटर्स प्रत्येक तालुक्यात आहेत. त्याठिकाणी 1251 बेड्सची क्षमता आहे. या सर्व 1957 बेड्सच्या सनियंत्रणासाठी जबाबदारींचे आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटप करुन देण्यात आली आहे.

नॅशनल अर्ली वॉर्निग स्कोर (News2) - कोरोनाबधिताला कोणत्या प्रकारे उपचार द्यावेतत्यांचे सनियंत्रण कसे करावे व त्याला कोणत्या ठिकाणी उपचार करावेत याचे उत्तर या नॅशनल अली वॉर्निग स्कोर द्वारे ठरविण्यात येणार आहे. ही पध्दत जगभर वेगवेगळे आजारावर रुग्णांसाठी वापरली जाते. यातून सर्व कोरोना बाधितांवर उपचार करताना सुसूत्रीपणा येणार आहे. यामध्ये 16 वर्षाच्या आतील मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी गुणांकन नसणार आहे. त्यांना आवश्यक सर्व उपचार केले जाणार आहेत. इतर गटात मोडणाऱ्या रुग्णांसाठी 8 मुद्यांवर 0 ते 3 गुणांकन केले जाणार आहे. प्रामुख्याने या पध्दतीत रुग्णाची ऑक्सीजन पातळीबाहय ऑक्सीजन पुरवठारक्तदाब,  हृदयाचे ठोकेबाह्य लक्षणेतापमान अशा बाबी तपासून गुणांक निश्चित केले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक रुग्णाला गुणांकानुसार वर्गीकृत केले जाणार आहे. यामध्ये इतर आजार असलेले (कोमॉर्बीड) व वय वर्षे 60 वरील व्यक्तींना जास्त गुणांक दिले जाणार आहे. यावरुन प्रत्येक रुग्णाची कमी मध्यम व जास्त धोक्याची पातळी ठरविली जाणार आहे. यावरुन रुग्णांची तपासणी वारंवारीताकुठे भरती करावयाचेकोठून कोठे रेफर करायेचे या बाबी तातडीने करता येतील. सदर पध्दती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार स्विकारण्यात आली असून जिल्हयात ती प्रथमच वापरली जाणार आहे.

नियंत्रण कक्षातून मिळणार मदत : जिल्हा स्तरावरती कोरोना बाबत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी गृह विलगीकरणातील रूग्णांना मदत मिळणार आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांना बेड मिळणसाठीचे तपशील या ठिकाणी दिले जाणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षामध्ये सद्या फक्त बेड्सची उपलब्धता व गृह विलगीकरणाविषयी माहिती दिली जाणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक आहेत 222030222035222031. या नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबत जिल्हास्तरावरील यंत्रणेचे प्रशिक्षण डॉ.विनोद मशाखेत्री यांचेकडूनदेणेत आले आहे असून उर्वरीत व्यक्तींचे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात घेतले जाणार आहे.

"जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असले तरी त्यातील बहुतेक रुग्ण बाधा होऊन बराच कालावधी झाल्या नंतर येत आहेत. एकदा संसर्गाचे प्रमाण हाता बाहेर गेल्यानंतर डॉक्टर्सही काही करू शकत नाहीत. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की काही कोरोना लक्षणे असल्यास आपली तपासणी दवाखान्यात करुन घ्यावी. आता जिल्ह्यात प्रत्येक बेड वरील रुग्णाची जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या डॉक्टर्सना देण्यात आली आहे. तसेच न्यूज2 या कार्यप्रणाली नुसार रुग्णांना कुठे भरती करावयाचेकशाप्रकारे त्यांच्यावर सनियंत्रण करायचे याबाबत सोप्या पद्धतीने काम होणार आहे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.