25 एप्रिल ला जिल्हयात जागतिक हिवताप दिन साजरा होणार.

गडचिरोली : - दि.23:   25 एप्रिल जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय किटकजन्य  रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन जागतिक स्तरावर साजरा केला जातो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापवर मात करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहे. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन म्हणून 25 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. हिवतापवर मात करायचे असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न बरोबरच जनतेचा सहभाग व सरकारी महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी प्रयत्न केले तर हिवतापाचा पराभव होईल. या दुष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीचा घोष वाक्य हिवतापाला "झिरो करु, आरोग्य धेय साकार करु" हे दिले आहे. या पार्श्वभूमिवर गडचिरोली जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थामध्ये हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होऊन मृत्यु होऊ नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने मोहिम राबविली जाणार आहे.

गडचिरोली जिल्हयात प्लाझमोडीअम वायव्हॅक्स व प्लाझमोडीअम फाल्सीफॅरम हे दोन प्रकारचे जंतु दिसून येतात. यात प्लाझमोडीअम फाल्सीफॅरम मृत्युस कारणीभूत असते. जिल्हयाची भौगौलिक स्थिती जंगल , नदी , नाले, व उष्ण वातावरण हिवतापाच्या प्रसारास कारणीभूत आहे. तसेच ग्रामीण भागात ताप आल्यास आरोग्य केंद्रात न जाता मांत्रिक पुजारी ,वैदू यांच्याकडे जाऊन उपचार केल्यामुळे हिवतापाचे निदान होऊ शकत नाही.

गडचिरोली जिल्हयात सन 2017 मध्ये 598160 रक्त नमुन संकलीत करण्यात आले. त्यात 5484 रक्त दुषित आढळून आले. व 5 हिवतापाने मृत्यु झाले, 2018 मध्ये 559296 रक्त नमुने संकलीत करण्यात आले होते. त्यात 2584 रक्त नमुन दुषित आढळून आले व 3 हिवतापाने मृत्यु झाले. 2019 मध्ये 607810 रक्त नमुन संकलीत करण्यात आले होते. त्यात 2428 रक्त नमुने दुषित आढळून आले. व 1 रुग्णाचा मृत्यु झाला. 2020 मध्ये 661169 रक्त नमुन संकलीत करण्यात आले. 6485 रक्त नमुने दुषित आढळून आले. त्यात 6 रुग्णांचा मृत्यु झाला व 2021 मार्च अखेर 316140 रक्त नमुन संकलीत करण्यात आले. त्यात 1021 रक्त नमुने दुषित आढळून आले व 2 रुग्णांचा मृत्यु झाला.

हिवताप आजार हा प्लाझमोडिअम परोपजिवी जंतु मुळे होतो व या आजाराचा प्रसार एनाफिलीस डासाच्या मादी मार्फत होतो. हिवतापाचे जंतु असलेल्या माणसाला डास चावून इतराना प्रसार करतो म्हणून या कोरोणाच्या संकटकालीन परिस्थितीत डासाच्या उत्पत्ती होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. थंडी वाजून येणारा ताप डोके दुखी, अंग दुखी ही हिवतापाचे सर्वसाधारण लक्षणे आहेत. तरी पण कोणत्याही ताप हा हिवताप असु शकतो असे गृहित धरुन वरील निदान झाल्यास हिवताप हा पूण बरा होऊ शकतो यासाठी हिवतापासाठी रक्त तपासणी करावी व जंतु च्या प्रकारानुसार औषधी घ्यावे. व नियमित मच्छरदाणीचा वापर करावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यानी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.