आज गडचिरोली जिल्ह्यात 12 मृत्यूसह 561 नवीन कोरोना बाधित तर 603 कोरोनामुक्त.

गडचिरोली : - दि.29: आज जिल्हयात 561 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 20658 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15650 वर पोहचली. तसेच सद्या 4624 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 384 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय पुरुष आंबेशिवनी गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष वडसा, 46 वर्षीय महिला गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष जामगिरी ता. चामोर्शी,  75 वर्षीय  महिला वडसा, 62 वर्षीय महिला  लाखांदूर जि. भंडारा, 54 वर्षीय पुरुष सोनापूर, गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष वैरागड, ता. आरमोरी, 65 वर्षीय पुरुष कडोली , ता. कुरखेडा, 38 वर्षीय पुरुष बोडधा, ता. वडसा, 53 वर्षीय पुरुष इंजेवारी , ता. आरमोरी, 63 वर्षीय पुरुष सिंदेवाही, जि. चंद्रपूर ,यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.56 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.38 टक्के तर मृत्यू दर 1.86 टक्के झाला.

नवीन 561 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 136अहेरी तालुक्यातील 56आरमोरी 10भामरागड तालुक्यातील 14चामोर्शी तालुक्यातील 73धानोरा तालुक्यातील 17एटापल्ली तालुक्यातील 18कोरची तालुक्यातील 10कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 62मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 24सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 28 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 53 जणांचा समावेश आहे. 

आज कोरोनामुक्त झालेल्या 603 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179अहेरी 45,  आरमोरी 38भामरागड 30चामोर्शी 63धानोरा 27 , एटापल्ली 50मुलचेरा 42सिरोंचा 06कोरची 30कुरखेडा 34तसेच वडसा येथील 59  जणांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.