ब्रेक दी चैन अंतर्गत जिल्ह्यात 15 मे 2021 पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी जाहीर.

गडचिरोली : - दि.30राज्यात कोविड-19 साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनानंतर्गत  फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश व कोविड-19 साथरोग संदर्भान मिशीन बिगीन अगेन अंतर्गत नियमावली व उपाययोजना जिल्ह्यात लागू आहेत. 

त्याअनुषंगाने शासन आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून यापूर्वी लागू असलेले लॉकडाऊन संदर्भात आदेश काढणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी शासन निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग अंतर्गत ब्रेक द चैन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधीत बाबींना जिल्हा गडचिरोली क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदी संदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी 01 मे 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून दिनांक 15 मे 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागू करीत आहे. 

यापुर्वीचे शासन आदेशातील अटी, शर्ती दंडाबाबत निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय- निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.