कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना.
गडचिरोली : - दि.23: राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत राज्य शासनाच्या 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत 14 एप्रिल पासून ते 30 एप्रिल 2021 पर्यंत जिल्हयात कलम 144 (संचारबंदी) जाहीर करण्यात आलेली असून अत्यावश्यक सेव वगळता इतर दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. या संचारबंदीच्या काळात जिल्हयातील कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्याच्य दृष्टीने सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय प्रशासकीय संकुल बॅरेक क्रमांक 02 गडचिरोली येथे नियंत्रण कक्ष/ मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील कामगारांनी संचारबंदीच्या काळात त्यांचे कामगार कार्यालयाशी संबंधित प्रश्न/समस्या सदरहु नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 07132-222412 किंवा ई-मेल आयडी glogadchiroli@gmail.com यावर लेखी नोंदवावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा