कोविड नियंत्रण कक्षातून मिळणार उपचारासाठी रूग्णांना मदत.

जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण पुर्ण.

गडचिरोली : - दि.22, : जिल्हयातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता सर्वस्तरावर योग्य सनियंत्रण व अचूक माहितीची गरज असते. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दोन दिवसापुर्वीच सनियंत्रण प्रणालीबाबत आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाने कोरोना बाबत जिल्हास्तरावर कोविड नियंत्रण कक्ष उभारला आहे. याबाबतचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. जिल्हा स्तरावरती कोरोना बाबत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून या ठिकाणी गृह विलगीकरणातील रूग्णांना मदत मिळणार आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांना बेड मिळणसाठीचे तपशील या ठिकाणी दिले जाणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षामध्ये सद्या फक्त बेड्सची उपलब्धता व गृह विलगीकरणाविषयी माहिती दिली जाणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक आहेत 222030222035222031. या नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबत जिल्हास्तरावरील यंत्रणेचे प्रशिक्षण डॉ.विनोद मशाखेत्री यांचेकडून देणेत आले असून उर्वरीत व्यक्तींचे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात घेतले जाणार आहे.

या नियंत्रण  कक्षामधून आरोग्य विभागाच्या अंतर्गत कामकाजाबाबतही काम पाहिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील व जिल्हा स्तरावरील रूग्णांचे व बेड्सचे तपशील एकत्रित करण्याचे कार्य केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक वार्ड व कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचारी यांना गुगल स्प्रेड शीट व गूगल फॉर्म दिले आहेत. सदर कर्मचाऱ्यांनी तपशील भरून ती माहिती जिल्हास्तरावरती एकत्रित केली जाणार आहे. यातून रूग्ण सेवा व उपचाराबाबतही मदत होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.