कल्लेड जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीतील मृत्यूंच्या दंडाधिकारीय चौकशी बाबत.

गडचिरोली : - दि.23: मौजा- कल्लेड जंगल परिसरात दिनांक 6 डिसेंबर,2017 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गतपोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना मौजा - कल्लेड जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन पुरुष व पाच महिला असे (सात) 7 अनोळखी ईसम गोळीबारात ठार झाले होते. अनोळखी नक्षल महिलेच्या मृतदेहाची छायाचित्राद्वारे आत्मसमर्पित नक्षल महिलेकडून ओळख पटविण्यात आली असून तिचे नाव विमला असे असल्याचे समोर आले आहे. पंरतू सदर महिलेचे मुळ नाव व पत्ता माहिती झाला नाही. ती तेलगू भाषिक असून तिच्याबाबत अधिक माहिती मिळणेबाबत आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व 176 अन्वये मृत्युच्या कारणांची दंडाधिकारीय चौकशी करुन अहवाल सादर करणेस आदेशीत केले आहे. अनोळखी मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया उप विभागीय दंडाधिकारीअहेरी हयांचे न्यायालयात सुरु आहे. तरी वरिल घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहेप्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहेत्यांनी दिनांक 9 मे 2021 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारीअहेरी हयाचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत दाखल करावे. असे उपविभागीय दंडाधिकारी राहुल गुप्ता (भा.प्र.से.) अहेरी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.