आज गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह 615 नवीन कोरोना बाधित तर 287 कोरोनामुक्त.

गडचिरोली : - दि.20: आज जिल्हयात 615 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 287 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 15929 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12242 वर पोहचली. तसेच सद्या 3447 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 240 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 15 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय पुरुष अहेरी,  65 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली,  72 वर्षीय पुरुष माडगांव ता. लाखांदूर जि. भंडारा, 82 वर्षीय पुरुष चामोर्शी, 44 वर्षीय महिला आरमोरी, 52 वर्षीय पुरुष गडचिरोली, 45 वर्षीय पुरुष माडेतुकूमगडचिरोली, 70 वर्षीय पुरुष घोट,ता. चामोर्शी,  69 वर्षीय पुरुष चामोर्शी, 53 वर्षीय पुरुष उमरेडजि.नागपूर, 49 वर्षीय पुरुष गडचिरोली , 52 वर्षीय पुरुष  आरमोरी , 71 वर्षीय पुरुष अर्जूनी मोरगाव,जि.गोंदिया , 60 वर्षीय महिला गडचिरोली, 45 वर्षीय पुरुष  नागपूर यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.85 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.64 टक्के तर मृत्यू दर 1.51 टक्के झाला.

नवीन 615 बाधितांमध्ये- गडचिरोली तालुक्यातील 185, अहेरी तालुक्यातील 46, आरमोरी 40, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 64, धानोरा तालुक्यातील 28, एटापल्ली तालुक्यातील 50, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 34, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 42, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 06 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 60 जणांचा समावेश आहे. 

आज कोरोनामुक्त झालेल्या 287 रूग्णांमध्ये- गडचिरोली मधील 109, अहेरी 40,  आरमोरी 19, भामरागड 12, चामोर्शी 17, धानोरा 14, एटापल्ली 06, मुलचेरा 07, सिरोंचा 03, कोरची 28, कुरखेडा 15, तसेच वडसा येथील 17  जणांचा समावेश आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.