पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोपर्शी चकमकीत अहेरी दलमचा खात्मा – गडचिरोली पोलिसांचा मोठा पराक्रम.

इमेज
गडचिरोली, 27 ऑगस्ट 2025 महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात तब्बल 48 तास चाललेल्या तुफानी माओवादविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अहेरी दलमसह चार जहाल माओवादी ठार करण्यात आले असून यामध्ये एका पीपीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरचा समावेश आहे. या चौघांवर मिळून 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सी-60 च्या 20 पथकांबरोबरच CRPF QAT च्या दोन तुकड्यांनी 25 ऑगस्टपासून कोपर्शी परिसरात शोधमोहीम सुरू केली. अवघड डोंगराळ जंगल, सततचा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी सलग दोन दिवस मोहीम चालू ठेवली. 27 ऑगस्टच्या सकाळी माओवादी दहशतवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र माओवादी अधिक आक्रमक झाले. प्रत्युत्तरादाखल आठ तास झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर पोलिसांनी चार माओवादी दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख : 1. मालु पदा (41, छत्तीसगड) – पीपीसीएम, कंपनी क्र. 10 दलम, बक्षीस ₹6 लाख, 8 गंभीर गुन्हे दाखल. 2. क्रांती ऊर्फ जमुना हलामी (32, गडचिर...

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारींचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश.

इमेज
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश; एसडीआरएफ पथके तैनात. गडचिरोली, दि. 28 ऑगस्ट : तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, याचा परिणाम म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज आढावा बैठक घेऊन महसूल, पोलीस आणि इतर संबंधित विभागांना तातडीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, तेलंगणातून जवळपास ८ ते १० लाख क्युसेक पाणी आज रात्री १० ते ११ वाजेदरम्यान सिरोंचा तालुक्यात पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांतील नदीकाठी असलेल्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत: नागरिकांना स्थलांतरित करा: सिरोंचा तालुक्यातील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना...

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

इमेज
गडचिरोली, 27 ऑगस्ट 2025 :- गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सोमवारी झालेल्या प्रचंड चकमकीत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले असून तीन महिलांसह एकूण चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गोपनीय माहितीनुसार गडचिरोली विभागातील गट्टा दलम व कंपनी क्र. 10 चे माओवादी कोपर्शी परिसरात दबा धरून बसल्याचे समजताच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील 19 C-60 पथके व CRPF QAT च्या 2 पथकांनी जंगल परिसरात मोठी शोध मोहीम राबवली. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे आव्हानात्मक परिस्थितीत पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली. आज सकाळी पथके परिसरात दाखल होताच माओवाद्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर परिसर ताब्यात घेतला. चकमक संपल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहीमेत 01 पुरुष व 03 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल आणि 01 .303 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी अभियान सुरूच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...

🚨 गडचिरोलीतील विदारक घटना : मृत्यूनंतरही मिळाला नाही सन्मान!.

इमेज
“खनिज संपत्तीवर डोळा, जनतेच्या जिवावर आळा!” गडचिरोली (ता. भामरागड) : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील कोयर गावातील ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पण मृत्यूनंतरही या बालकाला सन्मान मिळाला नाही, हे वास्तव संपूर्ण जिल्ह्याला चटका लावून गेले आहे. 🚑 मृतदेह खाटेवरून नाल्यातून वाहून नेला :- घटनेनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह भामरागड येथे नेणे आवश्यक होते. मात्र गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. नाल्यावर पूल नसल्याने कुटुंबीयांनी खाटेची कावड करून तब्बल १ किलोमीटर नाल्यातून वाट काढत मृतदेह वाहून नेला. त्यानंतर प्रशासनाच्या वाहनातून भामरागड येथे शवविच्छेदनासाठी पोहोचविण्यात आले. 🚨 ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही हाल अपार :- या घटनेमुळे दुर्गम भागातील नागरिकांची व्यथा पुन्हा एकदा उघड झाली आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटून गेली तरीही गावकऱ्यांना रस्ता, पूल आणि तातडीची आरोग्य सेवा मिळालेली नाही. जिवंतपणीच्या यातना आणि मृत्यूनंतरही असमान्य वेदना ही आजची वस्तुस्थिती आहे. “मुख्यमंत्री साहेबांचा आवडता जिल्हा… पण विका...

ई-पीक पाहणी ठप्प : शेतकऱ्यांना सरकारी योजनांचे लाभ मिळणार तरी कसे?

इमेज
गडचिरोली : जिल्ह्यातील बारा ही तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. पिककर्ज, शासकीय योजनांचे अनुदान व पीकविमा यासाठी सातबाऱ्यावर पिकांची नोंदणी आवश्यक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी अॅप सतत डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. शेतकरी सांगतात की, दिवसातून अनेकदा प्रयत्न करूनही अॅप उघडत नाही. "सर्व्हरशी संपर्क होत आहे, कृपया प्रतीक्षा करा, अन्यथा अॅप पुन्हा चालू करा" असा संदेश दिसत राहतो. त्यामुळे पिकांची नोंदणी थांबली असून हजारो शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे खरीप हंगामाला सुरुवात जूनपासून झाली असली तरी सरकारने यंदा दोन महिन्यांच्या उशिराने १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी सुरू केली. पिके आता काढणीला येऊ लागली आहेत, पण पाहणी अद्याप पूर्ण झाली नाही. अंतिम मुदत १४ सप्टेंबर असल्याने शेतकऱ्यांचा ताण वाढला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, सर्व्हर डाउनच्या कारणावरून काही ठिकाणी तलाठी व महसूल कर्मचारी अडवणूक आणि गैरप्रकार करत असल्याचे आरोपही होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित...

प्रगती नागरी सहकारी पतसंस्था येथे ध्वजारोहण संपन्न.

इमेज
प्रगती नागरी सहकारी पत संस्था आलापली. दि: 15/08/2025 रोजी प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आलापल्ली येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश दादाजी गोटमवार  यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी ध्वजारोहणाला उपस्थित संस्थेचे संचालक सचिनजी बिस्वास , मंगेश परसावार,संस्थेचे मुख्य व्यवस्थापक मनोज बैरागी, राकेश गण्यारपवार सुरेश गडमवार, संजय कुंडा गोरले, सतीश बिरेलीवार, साईनाथ मीरालवार यादवार, नारलावार बाबुल घोष, तसेच गावातील प्रतिष्ठित बहुसंख्य नागरिक उपस्थित होते  व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सुरजागड–गटटा रस्ता खनिकर्म निधीतून वगळला; कायदेशीर आधारांसहित भाकपा जिल्हा सहसचिवांचा प्रशासनाला सवाल.

इमेज
१५ सप्टेंबरला नागपूर येथे पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा. गडचिरोली, दि. १५ ऑगस्ट २०२५ :- जिल्ह्यातील खनिज उत्खननामुळे प्रभावित भागांच्या विकासासाठी District Mineral Foundation (DMF) अंतर्गत ₹१५० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. या निधीतून प्रत्यक्ष १५ किमी आणि अप्रत्यक्ष १५ किमी परिसरातील पायाभूत सुविधा, शिक्षण, सिंचन, आरोग्य आणि रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सुरजागड–गटटा या जीवनवाहिनीविषयी एकही रुपया निधीतून वाहून देण्यात आलेला नाही, असा आरोप कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केला आहे. ग्रामवासीय जीवनाचा सार: रस्ता ‘जीवनवाहिनी’ :- सुरजागड–गटटा रस्ता हे गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक प्रवासमार्ग आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका आणि वाहतुकीत अडचणी वाढल्या आहेत. गाववाढीव नागरी भागांच्या कामांना प्राधान्य देऊन या ग्रामीण रस्त्यास दुर्लक्ष करणे — हे निवडक धोरण व ग्रामविकासावरील अन्याय म्हणून मोतकुरवार यांनी आरोप केला. कायदेशीर पार्श्वभूमी: DMF आणि MMDR Ac...

ग्राम. पंचायत. कार्यालय कमलापुर ता. अहेरी जिल्हा. गडचिरोली तर्फे स्वातंत्र्य दिनांचा हार्दिक शुभेच्छा.

इमेज

ग्राम पंचायत कार्यालय किष्ठापुर वेल ता.अहेरी जिल्हा.गडचिरोली, तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

इमेज

तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करणारा ऑनलाइन जुगार तात्काळ बंद करा. AIYF गडचिरोली जिल्हा कोन्सिल.

इमेज
एटापल्ली – इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्रात ऑनलाइन जुगार आणि बेटिंग व्यवसाय झपाट्याने वाढत असून, यामुळे तरुण पिढी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडत असल्याचा इशारा ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF)ने दिला आहे. या पार्श्वभूमीवर AIYF गडचिरोली जिल्हा कोन्सिल,तर्फे एटापल्ली तहसील कार्यालय येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्रीला निवेदन देण्यात आले. हे निवेदन,Aiyf च्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा,म्हणून देण्यात आले असून, ऑनलाइन जुगारावर तात्काळ बंदी घालावी, तसेच तामिळनाडूच्या धर्तीवर कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी ठाम मागणी यामध्ये करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की IPL, क्रिकेट लीग, कॅसिनो गेम्स आणि विविध अॅप्समुळे लाखो युवक जुगाराच्या आहारी जात आहेत. यामुळे आर्थिक दिवाळखोरी, मानसिक ताण आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, दरवर्षी ३,००० पेक्षा अधिक आत्महत्यांचे प्रकार या कारणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन जुगार उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ६ लाख कोटी रुपये असून, यात परकीय कंपन्यांचा मोठा सहभाग असल्याचे ...

सुरजागड–गट्टा रस्ता दुरुस्तीचा सवाल तीव्र; भाकपाचा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरण्याचा इशारा.

इमेज
एटापल्ली | गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा हा सुमारे 20 किमी लांबीचा मार्ग अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रोज लाखो-कोट्यवधी रुपयांचे लोहखनिज याच मार्गाने बाहेर जात असूनही स्थानिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता मिळत नाही, याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) गडचिरोली जिल्हा कौन्सिलने बॅनर आंदोलनाची सुरुवात केली आहे. जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सुरजागड येथे झालेल्या भव्य सभेत भाकपा नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शासनाने तातडीने रस्त्याचे काम मंजूर करून सुरू केले नाही तर हजारो नागरिकांसह नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येईल. कॉ. सचिन मोतकुरवार यांचा इशारा भाकपा जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. सचिन मोतकुरवार यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “आमचे खनिज तुम्हाला हवे, पण आमच्या हक्काचा रस्ता मात्र नको — ही भूमिका अस्वीकार्य आहे. लाखो रुपयांचे खनिज रोज जात असताना स्थानिकांच्या जीविताची किंमत शासनासाठी शून्य आहे. हा संघर्ष केवळ रस्त्यासाठी नाही, तर आदिवासी जनतेच्या जगण्याच्या हक्कासाठी आहे.” ...

शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरणी राज्यस्तरीय एसआयटी गठित.

इमेज
आमदार सुधाकर अडबाले यांच्‍या प्रश्नानंतर शिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित. गडचिरोली : नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे राज्यातील बोगस शिक्षक पदभरती / शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा. यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी ४ जुलै २०२५ रोजी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करण्यात येणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देतांना सांगितले होते. त्‍यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्रधान सचिव यांनी 'एसआयटी'ची घोषणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला. यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अराजकता माजली आहे. शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा नागपूर या उपराजधानीत उघडकीस आला आहे. य...

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

इमेज
अहेरी, 8 ऑगस्ट :-  गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक, पण कौतुकास्पद घटनेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः हेलिकॉप्टर उडवत, हृदयविकाराचा झटका आलेल्या हेडरी पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक राहुल गायकवाड यांना तातडीने नागपूर येथे ‘एअरलिफ्ट’ करून त्यांचे प्राण वाचवले. या धाडसी कृतीमुळे प्रभाकरन यांच्यावर 'गडचिरोलीचा देवदूत' अशी उपाधी लावली जात आहे. 🚧 रस्त्यांचे हाल, पण उपाय नाहीत? मात्र याच कंपनीच्या लोह खनिज वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे आलापल्ली–आष्टी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही, अद्याप प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. ⚠️ वाहतुकीमुळे जीवितहानी, तरीही दुर्लक्ष? स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळे अनेकदा रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही, परिणामी गंभीर रुग्णांचे प्राणही गेले आहेत. पण अशा घटनांना प्रसारमाध्यमे व अधिकाऱ्यांकडून अपेक्षित गा...

वनजमिनीवर बेकायदेशीर कंटेनर? लॉयड मेटल कंपनीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मनमानी, वनविभाग गप्प!

इमेज
अहेरी, दि-05/08/2025 :- अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू (जि. गडचिरोली) येथील वन क्षेत्रात लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर निळ्या रंगाचा कंटेनर ठेवला आहे. सदर कृतीसाठी कोणतीही कायद्याने अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. कायद्याचा भंग — तरीही वनविभाग मौनात? वनअधिनियम 1980 व भारतीय वन कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वनजमिनीचा वापर सार्वजनिक किंवा खाजगी हेतूसाठी करण्याआधी राज्य शासनाची व वनविभागाची स्पष्ट मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय वनक्षेत्रात कंटेनर ठेवून स्पष्टपणे कायद्याचा भंग केला आहे. कंपनीच्या वाहनांची रोजची वर्दळ सदर कंटेनर ज्या जागी ठेवण्यात आला आहे, तिथून लॉयड मेटल कंपनीचे लोहखनिज वाहतूक करणारे जडवाहन दररोज मोठ्या प्रमाणात जातात. या कंटेनरचा वापर वाहतूक व्यवस्थापन केंद्र म्हणून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, हेडरी ते चंदनखेडी रस्त्यावर अनेक ठिकाणी असेच कंटेनर वनजमिनीवर ठेवले गेले असून, वनविभाग मात्र...

राज्य सरकारचा जनविकासा विरोधी चेहरा पुन्हा उघड –ST विभागाची जनतेच्या मागण्यांकडे पाठ

इमेज
गडचिरोली, दि. ४ ऑगस्ट २०२५ जनतेच्या मुलभूत गरजांकडे सरकार कसे दुर्लक्ष करत आहे, याचे ठळक उदाहरण पुन्हा समोर आले आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दि. १ जुलै २०२५ रोजी गडचिरोली-एटापल्ली व गडचिरोली-चामोर्शी-रेगडी-एटापल्ली या महत्त्वपूर्ण मार्गांवर विशिष्ट वेळेत बस सेवा सुरू करण्याची मागणी.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (ST) केली होती. या मागणीच्या अनुषंगाने दि. ३१ जुलै २०२५ रोजी ST विभागाने दिलेले उत्तर हे जनहितविरोधी मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण आहे.विभागाने म्हटले आहे की,सद्यस्थितीत विभागात ७३ चालक आणि १८२ वाहकांची कमतरता आहे. १०५ मानवविकास बस चालविणे बंधनकारक असल्यामुळे इतर नियोजित सेवा देता येणे शक्य नाही.  शासन व परिवहन व्यवस्थापन जनतेच्या दळणवळणाच्या गरजांना पूर्णपणे नजरेआड करत आहे.या मार्गांवर प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना रोजच्या जीवनासाठी ST बस ही अत्यावश्यक गरज आहे. आरोग्य, शिक्षण, कामासाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांवर सरकारने अक्षरशः पाय ठेवला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विभागात स्पष्टपणे चालक आणि वाहकांच्या...

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.

इमेज
एटापल्ली (२ ऑगस्ट) : एटापल्ली ते वांगेतुरी या मार्गावर सध्या राज्य परिवहन महामंडळाची बसफेरी सुरू आहे. या फेरीमुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र वांगेतुरी नंतरच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अजूनही बस सुविधे अभावी त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मेढरी हे गाव छत्तीसगड सीमेवरील शेवटचा टोकावर असून, बसफेरी त्या गावापर्यंत  पोहचल्यास आदिवासी भावांना मोठा दिलासा मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अहेरी आगार प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले. असून या निवेदनात म्हटले आहे की एटापल्ली–वांगेतुरी बसफेरी दररोज किमान एक वेळेस मेढरी गावापर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली. आहे.निवेदन देताना भाकपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार यांच्या सोबत भाकपा तालुका सहसचिव कॉ. विशाल पूज्जलवार आणि किसान सभा तालुका उपाध्यक्ष सत्तू हेडो उपस्थित होते.. कॉ. सुरज जक्कुलवार यांनी सांगितले की, मेढरीसह परिसरातील गावांमध्ये राहणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि स्थानिक जनता बँक व इतर शासकीय कामाकरिता एटापल्ली ये...

मुलचेरा तालुक्यात चिमुकल्यांचे शिक्षण चिखलात अडकले!प्रशासनाचे दुर्लक्ष — जीव मुठीत घेऊन शाळेत जाण्याची वेळ.

इमेज
"शिक्षण हक्काचा... पण पायाखालचा रस्ताच नाही!" 📰 प्रतिनिधी, दि-02/08/2025  :-   कोडीगाव टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील केवळ 19 विद्यार्थी — पण त्यांचे शाळेपर्यंतचे प्रवास गुढघाभर चिखल चिरत पार होतोय. पावसाळ्यात या शाळेभोवती चिखलाचे साम्राज्य पसरते, आणि रस्ता नसल्यामुळे चिमुकले जीव रोज जीव मुठीत धरून शाळेत जातात. काही पालक तर आपल्या मुलांना खांद्यावर उचलून शाळेत पोहचवत आहेत! 📸 वरील फोटो ही अस्वस्थ करणारी परिस्थिती जशीच्या तशी मांडतो — शिक्षणाच्या वाटेवर चिखल, धोकादायक वाटा, आणि चाचपडणारी बालपावलं! 🧒 शाळा + अंगणवाडी दोणीही धोक्यात: या शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीत येणाऱ्या गरोदर माता व स्तनदा महिलांना देखील या चिखलातून वाट काढावी लागते. पाय घसरून अनर्थ होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. 📢 मुख्याध्यापक रघुनाथ मडावी यांचा थेट आरोप: "शाळेसमोरील रस्त्याबाबत आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले. पण सरपंच उमेश कडते आणि ग्रामसेवक मोरेश्वर वेलादी यांच्याकडून कोणतीही कृती होत नाही. शाळेला कंपाऊंड नाही, विहिरीची सफाई नाही, आणि आता हा चिखल — यामुळे ...

20 वर्षांत प्रथमच गडचिरोलीत राज्य माहिती आयोगाची सुनावणी.

इमेज
'माहिती आयोग आपल्या दारी' उपक्रमातून नागरिकांच्या अधिकारांना नवा बळ – मुख्य आयुक्त राहुल पांडे यांची ग्वाही. गडचिरोली दि- 01/08/2025 : दूरवरच्या गडचिरोली जिल्ह्यात माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, राज्य माहिती आयोगाने तब्बल 20 वर्षांनंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष सुनावणी घेतली. 'माहिती आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत नियोजन भवन, गडचिरोली येथे आयोजित या विशेष सुनावणीत 100 द्वितीय अपील प्रकरणांवर निर्णय देण्यात आले. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे व नागपूर खंडपीठाचे आयुक्त गजानन निमदेव यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. यावेळी बोलताना आयुक्त पांडे म्हणाले की, “गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील जनतेपर्यंत माहितीचा अधिकार पोहचवण्याचा आमचा उद्देश आहे. 2023 पर्यंतच्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झाला असून, लवकरच 2024-25 सालातील अपिलांवर देखील सुनावणी घेण्यात येईल.” या उपक्रमामुळे अर्जदार, जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना नागपूर किंवा मुंबईला प्रवास करण्याची गरज भासली नाही. याम...