वनजमिनीवर बेकायदेशीर कंटेनर? लॉयड मेटल कंपनीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मनमानी, वनविभाग गप्प!

अहेरी, दि-05/08/2025 :- अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू (जि. गडचिरोली) येथील वन क्षेत्रात लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर निळ्या रंगाचा कंटेनर ठेवला आहे. सदर कृतीसाठी कोणतीही कायद्याने अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे.

कायद्याचा भंग — तरीही वनविभाग मौनात?
वनअधिनियम 1980 व भारतीय वन कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वनजमिनीचा वापर सार्वजनिक किंवा खाजगी हेतूसाठी करण्याआधी राज्य शासनाची व वनविभागाची स्पष्ट मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय वनक्षेत्रात कंटेनर ठेवून स्पष्टपणे कायद्याचा भंग केला आहे.

कंपनीच्या वाहनांची रोजची वर्दळ
सदर कंटेनर ज्या जागी ठेवण्यात आला आहे, तिथून लॉयड मेटल कंपनीचे लोहखनिज वाहतूक करणारे जडवाहन दररोज मोठ्या प्रमाणात जातात. या कंटेनरचा वापर वाहतूक व्यवस्थापन केंद्र म्हणून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, हेडरी ते चंदनखेडी रस्त्यावर अनेक ठिकाणी असेच कंटेनर वनजमिनीवर ठेवले गेले असून, वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

वनविभागाची भूमिका संशयास्पद, दुहेरी मापदंड?
सामान्य नागरिकांनी अशा वनजमिनीवर काही उभारले, तर वनविभाग तात्काळ कारवाई करतो. मात्र, मोठ्या खाजगी कंपनीने वनजमिनीचा सर्रास वापर करत असताना कोणतीही नोटीस व कारवाई झाली नसल्यामुळे विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.