ई-पीक पाहणी ठप्प : शेतकऱ्यांना सरकारी योजनांचे लाभ मिळणार तरी कसे?


गडचिरोली : जिल्ह्यातील बारा ही तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. पिककर्ज, शासकीय योजनांचे अनुदान व पीकविमा यासाठी सातबाऱ्यावर पिकांची नोंदणी आवश्यक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी अॅप सतत डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

शेतकरी सांगतात की, दिवसातून अनेकदा प्रयत्न करूनही अॅप उघडत नाही. "सर्व्हरशी संपर्क होत आहे, कृपया प्रतीक्षा करा, अन्यथा अॅप पुन्हा चालू करा" असा संदेश दिसत राहतो. त्यामुळे पिकांची नोंदणी थांबली असून हजारो शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विशेष म्हणजे खरीप हंगामाला सुरुवात जूनपासून झाली असली तरी सरकारने यंदा दोन महिन्यांच्या उशिराने १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी सुरू केली. पिके आता काढणीला येऊ लागली आहेत, पण पाहणी अद्याप पूर्ण झाली नाही. अंतिम मुदत १४ सप्टेंबर असल्याने शेतकऱ्यांचा ताण वाढला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, सर्व्हर डाउनच्या कारणावरून काही ठिकाणी तलाठी व महसूल कर्मचारी अडवणूक आणि गैरप्रकार करत असल्याचे आरोपही होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याच्या भीतीत आहेत.

महसूल विभागाकडे तालुक्यात किती शेतकऱ्यांनी पाहणी पूर्ण केली याची स्पष्ट माहिती नाही. दरवर्षी हीच समस्या समोर येत असूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी ठोस उपाययोजना करत नसल्याबद्दल शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे.

शेतकऱ्यांना पडला प्रश्न?
"सर्व्हर डाऊनच्या नावाखाली आमच्यावर अन्याय किती दिवस चालणार? पिकांची नोंद न झाल्यास आम्हाला कर्ज, अनुदान व विमाचा लाभ कसे मिळणार?"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.