मुलचेरा तालुक्यात चिमुकल्यांचे शिक्षण चिखलात अडकले!प्रशासनाचे दुर्लक्ष — जीव मुठीत घेऊन शाळेत जाण्याची वेळ.
📰 प्रतिनिधी, दि-02/08/2025 :- कोडीगाव टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील केवळ 19 विद्यार्थी — पण त्यांचे शाळेपर्यंतचे प्रवास गुढघाभर चिखल चिरत पार होतोय.
पावसाळ्यात या शाळेभोवती चिखलाचे साम्राज्य पसरते, आणि रस्ता नसल्यामुळे चिमुकले जीव रोज जीव मुठीत धरून शाळेत जातात. काही पालक तर आपल्या मुलांना खांद्यावर उचलून शाळेत पोहचवत आहेत!
📸 वरील फोटो ही अस्वस्थ करणारी परिस्थिती जशीच्या तशी मांडतो — शिक्षणाच्या वाटेवर चिखल, धोकादायक वाटा, आणि चाचपडणारी बालपावलं!
🧒 शाळा + अंगणवाडी दोणीही धोक्यात:
या शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीत येणाऱ्या गरोदर माता व स्तनदा महिलांना देखील या चिखलातून वाट काढावी लागते. पाय घसरून अनर्थ होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतोय.
📢 मुख्याध्यापक रघुनाथ मडावी यांचा थेट आरोप:
"शाळेसमोरील रस्त्याबाबत आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले. पण सरपंच उमेश कडते आणि ग्रामसेवक मोरेश्वर वेलादी यांच्याकडून कोणतीही कृती होत नाही. शाळेला कंपाऊंड नाही, विहिरीची सफाई नाही, आणि आता हा चिखल — यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे."
⚠️ फक्त कोडीगाव टोला नाही — आंबटपल्ली ग्रामपंचायतीच्या अनेक गावांत समस्यांचा डोंगर:
पाणी, वीज, नाली सफाई, आरोग्य — सर्वच क्षेत्रात बेफिकिरी! आजूबाजूच्या गावांत लोकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.
🛑 प्रश्न उपस्थित होतो —
शिक्षणाचा गजर फक्त भाषणापुरता? की प्रशासनाची झोप एवढी खोल की, चिखलात रुतलेल्या पावलांचा आवाजही पोहचत नाही?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा