ग्रामपंचायत नागेपल्ली येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात.

अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मजगी कामाचे पंचायत समिती सौ मोहुर्ले मॅडम व सरपंच श्री लक्ष्मण कोडापे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत नागेपल्ली येथील उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार, ग्रामपंचायत सदस्य श्री मल्लरेड्डी यमनुरवार, श्री फेलिक्स गिध, श्री राहुल सिडाम, सौ लक्ष्मीबाई सिडाम, श्री आशिष पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री लोमेश्वर वाळके, सामाजिक कार्यकर्ता श्री संतोष अग्रवाल तसेच रोजगार सेवक श्री श्रीनिवास कोटरंगे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावातील जनतेच्या हाताला काम नसल्याने लोक दुसऱ्या राज्यात कामाला जात असल्याचे ग्रा.प च्या लक्षात आले असता त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करून जनतेच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. ह्या कामावर बहुसंख्या मजुरांनी कामाला जाऊन मिळालेल्या रोजगाराच्या फायदा करून घ्यावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य सौ मोहुर्ले मॅडम व ग्रामपंचायत सरपंच श्री लक्ष्मण कोडापे यांनी क...