प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे अभिनंदन.

देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरल्याबद्दल सिनीयर एअर फोर्स विंगची छात्रसैनिक

वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन 

मुंबईदि. 28 :- यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच एनसीसी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या एनसीसी सिनीयर एअर फोर्स विंगची छात्रसैनिकवॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने यापूर्वी 17 वेळा पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याचेतसेच गेली दोन वर्षे उपविजेतेपद जिंकल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या छात्रसैनिकांच्या आजवरच्या गौरवशाली कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचे सर्व छात्रसैनिक एकता व अनुशासन’ या ब्रीदाचे पालन करुन समर्पित वृत्तीने राष्ट्रसेवा करतीलअसा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बॅनर)चा वाहक छात्रसैनिक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधवउत्कृष्ट गार्ड ऑफ ऑनरसाठी सन्मानित सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगरसिनियर अंडर ऑफिसर सोनाली पाटीलसिनियर अंडर ऑफिसर राघवेंद्रसिंह या छात्रसैनिकांसह महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरीकॅप्टन निकिता खोत आदी एनसीसी अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.