गडचिरोली जिल्हयात आज 284 कोरोनामुक्त, नवीन 328 कोरोनाबाधित.

गडचिरोली,दि.28आज गडचिरोली जिल्हयात 1092 कोरोना तपासण्यांपैकी 328 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 284 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34217 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32123 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1341 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.88 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.92 टक्के तर मृत्यू दर 2.20 टक्के झाला आहे.

आज नवीन 328 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 69,  अहेरी तालुक्यातील 33, आरमोरी तालुक्यातील 15भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 126धानोरा तालुक्यातील 20, एटापल्ली तालुक्यातील 17, मुलचेरा तालुक्यातील 10, सिरोंचा तालुक्यातील 03, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 13 आणि वडसा तालुक्यातील 20 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 284 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 139, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 38, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 24, सिरोंचा तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 14,आणि वडसा तालुक्यातील 06 जणाचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.