आज 88 कोरोनामुक्त, नवे 221 कोरोनाबाधित एनीमीया आजाराने ग्रस्त एका व्यक्तीचा कोविडने मृत्यू .

गडचिरोलीदि.21: आज गडचिरोली जिल्हयात 1027 कोरोना तपासण्यांपैकी 221 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 88 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32592 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30752 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1088 झाली आहे.  आज नविन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील 40 वर्षीय पुरुषाचा (एनीमीया आजाराने ग्रस्त ) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 752 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.34 टक्के तर मृत्यू दर 2.31 टक्के झाला आहे.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 88,अहेरी तालुक्यातील 03,आरमोरी तालुक्यातील 14भामरागड तालुक्यातील 04चामोर्शी तालुक्यातील 36धानोरा तालुक्यातील 11एटापल्ली तालुक्यातील 04मुलचेरा तालुक्यातील 07कोरची तालुक्यातील 01कुरखेडा तालुक्यातील 25,सिरोंचा तालुक्यातील 04आणि वडसा तालुक्यातील 24 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 88 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 47,अहेरी तालुक्यातील 12,आरमोरी तालुक्यातील 02,भामरागड तालुक्यातील 04एटापल्ली तालुक्यातील 03सिरोंचा तालुक्यातील 01कोरची तालुक्यातील 02कुरखेडा तालुक्यातील 05,आणि वडसा तालुक्यातील 09 जणाचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.