राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातील आमदारांच्या जावयाने सुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास केली बेदम मारहाण.

ऋतूराज हलगेकर, जयराज हलगेकर सह इतर ५-६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल.
एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यात जेंव्हा पासून सुराजगड प्रकल्प कार्यान्वित झाला होता तेंव्हा पासूनच प्रकल्पाच्या जवळ पासच्या अनेक गावातल्या नागरिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कित्येक वेळा आंदोलने केलेली असून सुरजागड प्रकल्पाच्या विरोधात अनेक तक्रारी महाराष्ट्र सरकार, गडचिरोली जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनकडे देण्यात आलेल्या आहेत.

मोठ्या प्रमाणात विरोध होत असतांनाही राजरोसपणे दररोज अवैध उत्खनन करून करोडोंचा खनिजमाल शेकडो गाड्याद्वारे जिल्ह्याबाहेर नेण्यात येत आहे. या प्रकल्पातून उत्खननात निघालेल्या लोहखनिजाची अवैध वाहतुक ही कोटींच्या घरात असल्यामुळे, या धंद्यात मोठे राजकीय नेते, बलाढ्य उद्योगपती शामिल असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. या अवैध धंद्यांवर अनेक राजकारणी नेते मंडळी, आपला राजकीय भविष्य चमकवण्यासाठी राजकीय आर्थिक वसुली करून, आपला राजकीय भविष्य दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या खनिज चोरीच्या उद्देशाने सुरजागड प्रकल्प अधिकारी व वाहतुकदार,आणि राजकीय नेत्यांचे आर्थिक देवाणघेवाण करण्यामध्ये काही दिवसापासून मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. या प्रकल्पातून अवैध मार्गाने वाहतूक करणाऱ्या लोकांनी, गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय लोकांना आर्थिक प्रलोभन दाखवून, पोलिस विभागाशी संगनमत करून, सरकारच्या खनिज विभागाला करोडोंच्या चुना लावुन मोठा प्रमाणात आर्थिक मलिंदा लाटलेला आहे.

अशाच प्रकारे एका आर्थिक देवाण घेवाण संबंधात आलेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांनी सूरजागड प्रकल्प अधिकारी अतुल खाडिलकर यांना आलापल्ली येथे त्यांच्या राहत्या घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना २४/०१/२०२२ रोजी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.

या विवादात राजकीय आर्थिक वसुली करण्याचा प्रयत्न करीत बाचाबाची झालेली असून करोडो रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी राजकीय दबावातुन मारहाण केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात लोकांमध्ये होतांना दिसत आहे.

सदर घटनेची सविस्तर माहिती पोलिस सूत्रांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केले असता राष्ट्रवादीचे नेते ऋतुराज हलगेकर यांनी आपला भाऊ जयराज आणि भोजराज यांच्या सह इतर ५-६ लोकांनी सुरजागड प्रकल्प अधिकारी अतुल खाडिलकर यांना आलापल्ली येथे राहत्या घरी जाऊन त्यांच्या घराचा समोरील दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अतुल खाडिलकर यांनी घरातून कोणताच प्रतिसाद न दिल्याने ऋतुराज हलगेकर व त्यांच्या सोबत आलेले ५-६ लोकांनी खाडिलकर यांच्या घराचा दरवाजा लाथाबुक्क्यांनी तोडून घराच्या आत जाऊन सामानाची नासधूस करीत अतुल खाडिलकर यांना जिवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली असून, त्या तक्रारीवरून ऋतुराज हळगेकर, जयराज हलगेकर व इतर लोकांवर भादवी कलम ४५२, ४२७, ३२३, १४३, १४७, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अहेरी पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.