मोहम्मद सादीक मोहम्मद उमर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती.
मुंबई, दि. 28 : - सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सादीक मोहम्मद उमर यांची नागपूर येथील भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासन अधिकारी या पदावरील त्यांचा कार्यकाळ हा त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांसाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे कमी असेल एवढा राहील, असे महसूल विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा