अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
एटापल्ली :- अहेरी विधानसभा अंतर्गत शिवसेना जनसपंर्क कार्यालय एटापल्ली येथे वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. शिवसेना तालुका प्रमुख मा. मनिष भाऊ दुर्गे तसेच युवासेना तालुका प्रमुख अक्षय भाऊ पुंगाटी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आली. सदर कार्यक्रमाचा औचित्य साधून नवनियुक्त एटापल्ली नगरपंचायत नगरसेवक मा. नामदेव भाऊ हिचामी यांचा सुद्धा स्वागत सत्कार करण्यात आले. तसेच इतर पक्षातील असंख्य कार्यकर्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केले.
या कार्यक्रमात प्रामुख्याने राहुल भाऊ आदे शिवसेना शहर प्रमुख, दल्लु भाऊ पुसाली उपतालुका प्रमुख, सुमित खन्ना युवासेना शहर अधिकारी,सलिम भाऊ शेख विभाग प्रमुख, सुजल वाघमारे शाखा प्रमुख, निहाल कुंभारे, विनोद मडावी, प्रशांत तलांडे, प्रसंजित बिश्वास, पवन कुलसंगे, ज्ञानेश्वर कांदो, अक्षय हिचामी, मोहीत दुर्गे, हर्षद शेख, शांतनु उईके, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा