अहेरी येथे शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

अहेरी :- अहेरी विधानसभा अंतर्गत शिवसेना जनसपंर्क कार्यालय अहेरी येथे वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख मा. श्री रियाजभाऊ शेख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आली. सदर कार्यक्रमाचा औचित्य साधून अहेरी विधानसभा उपजिल्हा संघटिका सौं पौर्णिमा ईष्ठाम यांच्या मार्फत हळदीकुंकूचा व तिळगुळ कार्यक्रम घेण्यात आला. तसेच इतर पक्षातील असंख्य कार्यकर्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केले.
या कार्यक्रमात प्रामुख्याने श्री अरुणभाऊ धुर्वे-उपजिल्हा प्रमुख, श्री दिलीपभाऊ सुरपाम- युवासेना जिल्हाअधिकारी, कु. तुळजा तलांडे- युवतीसेना जिल्हाअधिकारी, नवनियुक्त अहेरी नगरपंचायत नगरसेवक नौरास रियाज महंमद शेख, नगर सेवक अहेरी श्री विलास सिडाम, तसेच अहेरी तालुका प्रमुख श्री प्रफुल येरणे आणि श्री अक्षय करपे, अहेरी तालुका महिला संघटिका- सौ सपना ईश्वरकर, गुड्डू ईष्ठाम, हमजा शेख युवासेना तथा सिडाम व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.