एटापल्ली, नगरपंचायतमध्ये निवडुन आलेले प्रभाग क्र-१५ चे अपक्ष नगरसेवक श्री नामदेव वंजा हिचामी यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश.

एटापल्ली:- नगरपंचायतच्या निवडणुकीत निवडुन आलेले प्रभाग क्रं-१५ चे अपक्ष नगरसेवक श्री नामदेव वंजा हिचामी यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जिल्ह्यातील विकासकामे बघुन, श्री किशोर पोतदार साहेब जिल्हा संपर्क प्रमुख, श्री रियाज शेख जिल्हा प्रमुख, मा. श्री किरणजी पांडव साहेब जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केले. 

यावेळी मा. श्री किरणजी पांडव साहेब यांच्या हस्ते श्री नामदेव वंजा हिचामी यांच्या सत्कार करण्यात आले व त्यांनी म्हणाले की एटापल्ली नगरपंचायतसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उध्दवजी ठाकरे साहेब व नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडुन जास्तीत जास्त विकास कामासाठी निधी देण्यात येईल व नगरपंचायतचा विकास कामाचा आराखडा तयार करून जनतेला विकास कामातुन न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन देऊन सर्व मतदारांचे आभार मानले.

यावेळी श्री मनिष दुर्गे तालुका प्रमुख,श्री अक्षय पुंगाटी युवासेना तालुका युवा अधिकारी, श्री सुजल वाघमारे युवासेना शाखा युवा अधिकारी, श्री विनोद मडावी शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.