पोस्ट्स

ब्रेक दी चैन अंतर्गत जिल्ह्यात 15 मे 2021 पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी जाहीर.

इमेज
गडचिरोली : -  दि.30 :  राज्यात कोविड-19 साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनानंतर्गत  फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश व कोविड-19 साथरोग संदर्भान मिशीन बिगीन अगेन अंतर्गत नियमावली व उपाययोजना जिल्ह्यात लागू आहेत.  त्याअनुषंगाने शासन आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून यापूर्वी लागू असलेले लॉकडाऊन संदर्भात आदेश काढणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी शासन निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग अंतर्गत ब्रेक द चैन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधीत बाबींना जिल्हा गडचिरोली क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदी संदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी 01 मे 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून दिनांक 15 मे 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागू करीत आहे.  यापुर्वीचे शासन आदेशातील अटी, शर्ती दंडाबाबत निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संबंधित व्यक्त...

शेतकरी गटाने कृषी अवजारे योजनेचा लाभ घ्यावा.

गडचिरोली : -  दि.30 :  क ु रखेडा- मानव विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकरी गटांना विविध उपकरणे उपलब्ध करूनदेण्याची योजना आहे कुरखेडा तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी ,  शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या   योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुरखेडा तथा निवड समिती सचिव कु.सुरभी  बाविस्कर यांनी केले आहे. सन- 2020-21  या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी गटांना विविध उपकरणेउपलब्ध करून देण्याचे योजनेत राईस डी हासकिंग   मशीन , भात झोडणी यंत्र ,  बहुपीक टोकण यंत्र तथा  भाजीपाला रिजर व कोळपे  ,  ताडपत्री पॅकिंगसह ,  स्वयंरोजगार किट ,  हस्त चलित कडबा कट अडकित्ता इत्यादी  साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता कुरखेडा तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे.तरी तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी ,  शेतकरी कंपन्यांनी ,  महिला शेतकरी बचत गटांनी ,  सेंद्रिय शेतीबचत गट यांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक  12  मे  2021  पर्यंत तालुका कृषी अधिकारी ,   कार्यालय कुरखेडा ...

आज गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह 519 नवीन कोरोना बाधित तर 577 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि. 30:   आज जिल्हयात  519  नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज  577  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 2 1177  पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या  16225  वर पोहचली. तसेच सद्या 4 552  सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण  400  जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज  16  नवीन मृत्यूमध्ये  65  वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी ,63 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा , 43 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 65वर्षीय पुरुष देसपूर ता. आरमोरी, 20 वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, 67 वर्षीय पुरुष गोगांव ता. गडचिरोली, 51 वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, 70 वर्षीय पुरुष वडसा, 58 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा , 68 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 40 वर्षीय पुरुष मोझरी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, 80 वर्षीय पुरुष एटापल्ली, 69 वर्षीय पुरुष हरबी डोंगरगांव ता. वडसा, 65 वर्षीय पुर...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.

इमेज
गडचिरोली : -  दि.30 :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज   यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे  यांनी   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .  यावेळी प्र.तहसिलदार किशोर भांडारकर, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे,   श्री. चंहादे,  दयाराम मेश्राम, जी. आर. मालवी,  जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, वामन खंडाईत   उपस्थित होते. उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांनी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  जयंती थोडयाच लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे.

इमेज
मुंबई : -   दि .  ३० : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ .  राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे . मेडिकल ऑक्सिजनचे समप्रमाणात वितरण अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-२९.४.२०२१ साठी १६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया ,  लींडे ,  एअर लिक्विड ,  टायो निप्पॉन ,  जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र दि. २४ एप्रिल ,...

कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील कामगार बांधवांना कामगार मंत्र्यांच्या शुभेच्छा.

इमेज
राज्याच्या विकासात कामगारांचे योगदान महत्वाचे कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामगार विभाग  कटिबद्ध  कामगार - मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : -   दि.३० : गेल्या वर्षभराहून   अधिक काळ आपण सर्व जण कोविड-१९ या विषाणूविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याने राज्यात १५ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत राज्यातील कामगारांचे अनन्यासाधारण महत्व आहे. महाराष्ट्र हे अनेक कामगार कायद्यांचे जनक आहे. राज्य शासन महाराष्ट्रातील कामगारांच्या सुरक्षेला ,  आरोग्याला आणि एकंदरच सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन विविध कायदे कामगारांच्या हितासाठी राबवित आहे. यापुढील काळातही महाराष्ट्रात कामगारांचे हक्क आणि त्यांचे हित अबाधित ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षभरात आपण प्राधान्याने कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.यापुढी...

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.

इमेज
मुंबई : -  दि.30 :  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ,  चित्रमहर्षी दादासाहेब फाळके साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना ,  अलौकिक कर्तृत्वाला विनम्र अभिवादन. भारतीय चित्रपटसृष्टीला आज लाभलेल्या वैभवामागे चित्रमहर्षी दादासाहेबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी व केलेले परिश्रम आहेत. भारतात चित्रपटनिर्मिती करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी लंडनमध्ये जावून चित्रपटनिर्मितीचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक कलात्मक तसेच तांत्रिक बाजू आत्मसात केल्या. ' राजा हरिश्चंद्र '  हा मूकपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दादासाहेबांसारख्या मराठी माणसानं रचलेल्या पायावर आज भारतीय चित्रपटसृष्टी अनेक दृष्टीनं समृद्ध झाली आहे ,  दिमाखदार कामगिरी करत आहे ,  ही बाब अभिमानाची व प्रेरणादायी आहे. चित्रमहर्षी दादासाहेबांना भावपूर्ण आदरांजली.