लोकशाही दिन सभा रद्द

गडचिरोली, (जिमाका) दि.२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारी जिल्हास्तरावरील लोकशाही दिन सभा सध्या आयोजित करण्यात येणार नाही.

 दिनांक १८ मे २०२६ पासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत जिल्हास्तरावर लोकशाही दिन सभा घेण्यात येणार नाही.
आचारसंहिता संपल्यानंतर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार लोकशाही दिन सभेचे आयोजन पूर्ववत करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.