एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटात शेकडो युवक- महिलांचा पक्ष प्रवेश.

एटापल्ली (प्रतिनिधी) – “गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट हेच खरे पर्याय” असा विश्वास दाखवत एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायत क्षेत्रातील शेकडो युवक व महिलांनी मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम केली.

आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या उपक्रमासाठी श्री. उमेशजी दासरवार, मनीषजी दुर्गे व संजयजी चरडुके यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने संघटनात्मक पातळीवर जोरदार पायाभरणी केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

कार्यक्रमाला सिनेट सदस्य आदरणीय तनुश्री ताई आत्राम, तालुकाध्यक्ष सांभा हिचामी, ज्येष्ठ नेते नसरू भाई शेख, दामा नरोटेजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी प्रवेश केलेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे आहे
गाव – वाघेझरी
प्रवीण शेंडे, मनोज कोवासे, अंबादास कावळे, प्रकाश मोहरले, मानु कोंदामी, राकेश झोरे, मनोज झोरे, ऋषी मट्टामी, प्रकाश पुंगाटी, सुरेश कोंदामी, आकाश गुंडरू, गीता शेंडे, आरजू कोवासे, विनाबाई गेडाम, लीलाबाई शेंडे, वंदनाबाई मोहुर्ले, मालाबाई गुरुनुले, पुष्पबाई मोहुर्ले.

गाव – गडेरी
राकेश इस्टाम, किशोर इस्टाम, मंगेश उसेंडी, नानाजी उसेंडी, दरसु उसेंडी, शंकर मटामी, भाऊजी गोटा, देवाजी तिम्मा, राजू कुमरे, मुषा कोंदामी.

गाव – झुरी
भावचंद हिचामी, वारलू पल्लो, शंकर मट्टामी, मनोज हिचामी, मंगेश हिचामी, आकाश हिचामी.

या पक्ष प्रवेशामुळे वाघेझरी ग्रामपंचायत क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद प्रचंड वाढली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या गटाची झंकार अधिक ठळकपणे जाणवणार हे निश्चित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.