शिवसेना-युवासेना एटापल्ली यांची खाजगी नेटवर्क सेवा चालू करण्याबाबतची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन.
एटापल्ली :- एटापल्ली क्षेत्रातील बी.एस.एन.एल. नेटवर्क सेवा प्रणाली विस्कळीत झाले असून तालुक्यातील स्थानिक लोकांना या सर्व गोष्टींची अडचण होत आहे तालुक्यातील सर्व कामे इंटरनेटच्या माध्यमातून केले जाते मग होणारा त्रास हा शासकीय विभाग, शिक्षण विभाग आणि संपूर्ण तालुक्याला पडत असून हा त्रास कमी करण्यासाठी जिओ, एअरटेल, आयडिया व इतर कोणत्याही एक नेटवर्कची सुविधा देण्याचे करावे अशी मागणी तालुका स्तरावरुन शिवसेना शाखेपर्यंत येत असून ही मागणी अत्यंत महत्वपूर्ण आहे करिता ही मागणी मंजूर करण्यात यावी. जेणेकरून तालुक्यातील जनतेला या नेटवर्क प्रणालीची अडचण होणार नाही आणि तालुका सक्षम बनेल. शिवसेना-युवासेना एटापल्ली यांची खाजगी नेटवर्क सेवा चालू करण्याबाबतची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन.
निवेदन देताना अक्षय भाऊ पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी एटापल्ली, मनीष भाऊ दुर्गे शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली, सलीम भाई शेख शिवसेना विभाग प्रमुख, सुमित खन्ना युवा सेना शहर प्रमुख, नेहाल कुंभारे युवा सेना उपशहर प्रमुख, पवन भाऊ कुळसंगे शाखाप्रमुख प्रभाग क्र. १५, सुहास कुमरे युवासेना शाखाप्रमुख जारावंडी तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा