तूर मिनिकिट वितरणाचे आयोजन

MahaDBT पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली, (जिमाका) दि.०२: खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार तूर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत तूर मिनिकिट वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.

तूर हे जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य पीक असून उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी सुधारित वाणांच्या बियाण्यांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत निवडक शेतकऱ्यांना तूर मिनिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर ( https://mahadbt.maharashtra.gov.in ) अथवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) मार्फत अर्ज करावा. अर्ज करताना Agristack Farmer Id/आधार क्रमांक, ७/१२ उतारा, ८-अ उतारा व इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड लाभार्थ्याचे Agristack Farmer Id असणे अनिवार्य आहे.लाभार्थीची निवड महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्‌वारे "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यानुसार करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु असून, योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यानी घ्यावा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवगीतील लाभार्थ्यांना वितरित लक्षांकाच्या मर्यादेत प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. एकूण लाभार्थ्यापैकी किमान ३० टक्के महिला लाभार्थ्याची निवड करण्यात यावी तसेच तृतीयपंथी लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. योजनेचा लाभ संगणकीय सोडतीद्वारे निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती म. हिरळकर यांनी केले आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.