उन्हाळी प्रशिक्षण शिबीराअंतर्गत स्पोर्टस् इंज्युरी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शनाचे आयोजन संपन्न

गडचिरोली, (जिमाका) दि.०२: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार व्हावा व खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ११ मे २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स एरिया, गडचिरोली, शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली व क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी ६.०० ते ८.३० व सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीरात कुस्ती, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग, बॉस्केटबॉल, मैदानी व बॉल बॅडमिंटन या खेळाचे २०० ते २५० प्रशिक्षणार्थी नियमित तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. 

स्पर्धेदरम्यान खेळाडूंना स्पोर्टस् इंज्युरी झाल्यामुळे अनेकदा खेळाडूला स्पर्धा तथा सरावापासून वंचीत राहावे लागते. झालेली इंज्युरी / दुखापत दुरुस्त करण्याकरीता किंवा टाळण्याकरीता प्रशिक्षण शिबीराचाच एक भाग म्हणून २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता स्पोर्टस् इंज्युरी व त्यावरील उपाययोजना तथा समुपदेशन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाळु सहारे, अस्थिरोग तज्ञ, संचालक, नोबेल मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल, गडचिरोली व सुशिल चांदेकर, डी.वाय.एस.पी., एस.आय.डी., गडचिरोली व भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली हे उपस्थित होते. डॉ. बाळु सहारे यांनी क्रीडा सराव तथा स्पर्धेदरम्यान इजा झाल्यास प्राथमिक उपचार कशाप्रकारे करता येईल व दुखापत झाल्यास त्यावर कोणती उपाययोजना करता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच स्पोर्टस् इंज्युरी झाल्यानंतर त्या व्यायामाच्या माध्यमाने लवकर दुरुस्त करण्याकरीता विविध उपाययोजना सांगीतले. सदर व्याख्यानादरम्यान उपस्थित खेळाडूंनी स्पोर्टस् इंज्युरीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर डॉ. बाळु सहारे यांनी मुलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय योजना कसे करता येईल ते सांगीतले. शोल्टर डिसलोकेशन, क्रॅम्प इत्यादी दुखापतीवर प्राथमिक उपाययोजना कशी करता येईल हे व्याख्यानातून सविस्तर सांगीतले.

सुशिल चांदेकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थित खेळाडूंसोबत परिसंवाद साधला. खेळाडूनां पौष्टीक आहाराचे महत्व समजावून सांगीतले. तसेच खेळाडूंनी कोणत्याही जंक फुड खाणे टाळावे किंवा काय खाऊ नये यावर मार्गदर्शन केले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्कर घटाळे यांनी खेळाडूंनी फक्त प्रशिक्षण शिबीर संपल्यावरही सर्व खेळाडूंनी मैदानावर जास्तीत जास्त उपस्थितीबाबत खेळाडूंना आवाहन केले. खेळाडूंनी नियमित सराव करुन राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगीरी करण्याकरीता प्रोत्साहित केले व तसेच क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगीरी करुन आपले करीयर घडविता येऊ शकते याबाबत खेळाडूंना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन नाजुक उईके, क्रीडा मार्गदर्शक (व्हॉलीबॉल) यांनी केले यांनी केले व आभार प्रदर्शन एस.बी. बडकेलवार, क्रीडा मार्गदर्शक (कुस्ती) यांनी केले. यासमुपदेशन कार्यक्रमाप्रसंगी शिबीरात सहभागी प्रशिक्षणार्थी, राज्य / राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते व कार्यालयातील चंद्रशेखर मेश्राम, क्रीडा अधिकारी, पंकज मडावी, अनिकेत सिडाम व कार्यालयातील मानद कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.