एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादीत नाराजीचे सुर - मनिष भाऊ दुर्गे यांचे खच्चीकरणाचा आरोप.
एटापल्ली दि-24/07/2025 - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये 500 कार्यकर्त्यांसह प्रवेश करूनही, मनीष भाऊ दुर्गे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आज एटापल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. सदर बैठकीत सहभागी कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "विधानसभा निवडणुकीत गावोगावी जाऊन आम्ही आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी झटून प्रचार केला. मात्र, आमच्या नेत्याला तालुका कार्यकारिणी अध्यक्ष पदावरून कटकारस्थान करून हटवले गेले, यामुळे आम्ही खचलेलो आहोत." बैठकीत पक्षातील अंतर्गत दुजाभाव, गटबाजी आणि कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक स्वरात सांगितले की, "नेतृत्वावर अन्याय झाला, तर आमचे भवितव्य काय?" या बैठकीत पुढील भूमिका ठरवण्यासाठी एकमताने पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाची शक्यता वर्तवण्यात आली. उपस्थितांनी ठामपणे सांगितले की, पक्षाकडून जर न्याय मिळाला नाही, तर आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही...