पोस्ट्स

जिल्ह्यात कलम ३७ (१)(३) अन्वये मनाई आदेश जारी

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२७: जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांकडून आपआपले सोईनुसार विविध ठिकाणी विनापरवाना थोर महापुरुषांचे पुतळयांचे अनावरण करण्यात येत असल्याचे घटना घडून येत आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन समाजामध्ये थोर पुरुषांचे पुतळे बसविणे अनावरण करणे या कारणावरुन तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ३०.०५.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक १३.०६.२०२६ चे २४.०० वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक ३०.०५.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक १३.०६.२०२६ चे...

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळावा संपन्न

गडचिरोली, (जिमाका) दि.२७: नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, यांच्या वतीने २६ मे २०२६ रोजी शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी ‍ येथे रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.  तसेच मेळाव्याकरीता कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेंद्र शेंडे , सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. अविनाश गौरकार, प्राचार्य, शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.   पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास एकुण ७० पेक्षा अधिक उमेदवारांनी आणि एकुण ६ उद्योजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदविलेला असून त्यांच्याकडील विविध रिक्त पदांबददल उमेदवारांना माहिती दिली. त्यामध्ये सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव स...

उद्योगात प्रत्यक्ष कामाची तरुणांना संधी

पंतप्रधान इंटर्नशीन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात गडचिरोली, (जिमाका) दि.२७: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत “ पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची “ घोषणा केलेली आहे.सन २०२६ -२७ मध्ये या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, देशभरात ३१ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, उत्पादन, माध्यम, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यप्रशिक्षण उपलब्ध आहे.या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांची शैक्षणिक पात्रता दहावीपासून बारावी, आयटीआय, पद...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय सन्मान हा प्रत्येक देशभक्ताची भावना

इमेज
त्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्याबाबतचा शासकीय ठराव पावसाळी अधिवेशनात पारित करावा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची राज्य शासनाकडे मागणी २८ मे रोजी देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी होत असताना त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दिनांक ५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी सावरकरांना भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने मरणोत्तर सन्मानित करण्यासाठी मांडलेल्या अशासकीय ठरावाच्या अनुषंगाने राज्य शासनाने शासकीय ठराव पारित करून केंद्र शासनाकडे पाठविण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची खंत व्यक्त करत, येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय प्राधान्याने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री तसेच राजशिष्टाचार मंत्री यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. विधानसभेत ठराव मांडताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या थोर कार्याचा सविस्तर आढावा घेतला होता. “सावरकरांचे संपूर्ण आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्...

लोकशाही दिन सभा रद्द

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारी जिल्हास्तरावरील लोकशाही दिन सभा सध्या आयोजित करण्यात येणार नाही.  दिनांक १८ मे २०२६ पासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत जिल्हास्तरावर लोकशाही दिन सभा घेण्यात येणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार लोकशाही दिन सभेचे आयोजन पूर्ववत करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी गडचिरोली यांनी कळविले आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२६: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पुर्व परिक्षा २०२६ ही परिक्षा गडचिरोली येथील चार परिक्षा उपकेंद्रावर (शाळा/महाविद्यालयात) सकाळी १०.०० ते ५.०० पर्यतच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, नितीन गावंडे यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.  निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु...

महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्पविकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०१: महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त केला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सहपालकमंत्री पुढे म्हणाले की, एकेकाळी विकासापासून दूर असलेला गडचिरोली जिल्हा आज परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माओवादावर प्रभावी नियंत्रण मिळवत जिल्ह्यात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण, अटक आणि कारवायांमुळे माओवाद्यांचा प्रभाव कमी झाला असून पोलीस मदत केंद्रांच्या स्थापनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून लाखो नागरिकांना विविध योजनांचा लाभ ...