पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळावा संपन्न
गडचिरोली, (जिमाका) दि.२७: नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, यांच्या वतीने २६ मे २०२६ रोजी शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी येथे रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.
तसेच मेळाव्याकरीता कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेंद्र शेंडे , सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. अविनाश गौरकार, प्राचार्य, शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.
पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास एकुण ७० पेक्षा अधिक उमेदवारांनी आणि एकुण ६ उद्योजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदविलेला असून त्यांच्याकडील विविध रिक्त पदांबददल उमेदवारांना माहिती दिली. त्यामध्ये सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव सोसायटी, चामोर्शी, एल .एन.टी फायनान्स, नागपूर, संसूर सृष्ठी, गडचिरोली, AISA , नागपूर, श्री.बालाजी ॲटोमोबाईल ॲण्ड सर्विसिंग सेंटर गडचिरोली व V.R. इंटरप्राईजेस चंद्रपूर या नामांकित उद्योजकांनी रोजगार मेळाकरीता सहभाग घेतलेला असून त्यांनी अनेक विविध क्षेत्रातील रिक्त पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यांत आल्या. त्यामध्ये एकुण ४१ पेक्षा अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली आहे. व उर्वरित उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करत रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा