शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी 30 एप्रिल ची मुदत

गडचिरोली,दि.22 : जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगर व्यावसायीक, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांनी सन 2022-23, 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित अनु.जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी व भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही भरपुर प्रमाणात प्रलंबित असलेले अर्ज अद्याप पर्यंत मंजूरी करीता सादर केलेले नाहीत, त्यांना अर्ज पाठविण्याची मुदत दिनांक 30 एप्रिल 2024 ही आहे. महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन विहीत वेळेत अर्ज मंजूरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली ना काढल्यास तसे अर्ज प्रणालीतुन कायमस्वरुपी रददबातल (Auto Reject ) होतील याची सर्वांनी दखल घ्यावी. महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नविन अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2024 ही शेवटची संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.