आलापल्लीचे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातडीवर.

राष्ट्रीय हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ दुसरा स्थानी आला असून या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याला 1 सुवर्ण, 4 रजत, पदके मिळाली. आलापल्ली:- उत्तर प्रदेशातील लखनौ येथील लालजी टंडन चौक स्टेडियम येथे २७ मार्चपासून आयोजित फर्स्ट हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्सची रंगीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा. आज समारोप झालेल्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशच्या संघाने २० सुवर्ण पदके, १० रौप्य पदके व ६ कांस्य पदकांसह विजेतेपद पटकावले, तर महाराष्ट्राने १७ सुवर्ण पदके, १६ रौप्य पदके व ११ कांस्य पदकासह द्वितीय विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर महाराष्ट्रतर्फे खेळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा सुमित खंडारे याला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात याला. यासोबतच HSFA,BULDHANA संघटनेचे अध्यक्ष विजय वाळेकर यांची भारतीय संघाच्या डेव्हलपमेंट कमिटीच्या डायरेक्ट पदावर नियुक्ती करण्यात आली. सदर स्पर्धेत फाईट इव्हेंट मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील खेळाडू कु. रेशमा कोरसा सुवर्णपदक मिळाले तसेच कु. अनन्या सामलवार, काजल गुट्टे , सनी सलामे व सुरेश मडावी यांना रजत प...