वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईनकरिता गडचिरोली तालुक्यातील रेल्वे भुसंपादन जमीन खरेदी प्रक्रिया सुरु.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप.
गडचिरोली,दि.16: विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता मौजा काटली, साखरा, महादवाडी, अडपल्ली, गोगाव, लांझेडा, गडचिरोली व मोहझरी पॅच येथील रेल्वे प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या खाजगी जमिनीचे भुसंपादन काम सुरू आहे. त्याअंतर्गत विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयाकडून दिनांक 11.03.2022 पासून वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरीता जमीन भुसंपादनबाबत संबंधित भुधारकांकडून खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार दिनांक 11.03.2022 रोजी मौजा अडपल्ली येथील माणिकदास धर्मा शेंडे,  मारोती गोपाळा मुप्पीडवार व गिरीधर लटारू चौधरी यांचे जमीनीचे भुसंपादन करण्याबाबत दुय्यम निबंधक, गडचिरोली यांचे कार्यालयात नोंदणीकृत खरेदीखत तयार करण्यात येऊन व दिनांक 14.03.2022 रोजी  जिल्हाधिकारी, गडचिरोली  संजय मीना यांचे हस्ते संबंधितास धनादेश वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी, गडचिरोली आशिष येरेकर  हे उपस्थित होते.
वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन करिता गडचिरोली तालुक्यातील रेल्वे भुसंपादनमध्ये जमीन खरेदी करणे सुरु झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची जमीन लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे असे विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.