आठ महिन्यापासुन बंद असलेले पुस्कोटी गावातील वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत शिवसेनेची मागणी.

एटापल्ली :- ११/०३/२०२२ रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा क्षेत्रातील वांगेतुरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले पुस्कोटी गावातील वीज पुरवठा मागिल ८ महिन्यापासून बंद होता. याबाबत गावकऱ्यांनी विद्युत विभागाला विज पुरवठा सुरू करण्यासाठी अनेकदा तोंडी व लेखी निवेदन दिले. 

परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित एटापल्ली येथील अधिकारी सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पुस्कोटी गावातील लोकांनी विज पुरवठा सुरू करण्याबाबतची समस्या घेऊन एटापल्ली येथील शिवसेना कार्यालयात निवेदन दिले. शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी सदर निवेदनाची दखल घेऊन विद्युत कंपनीच्या अभियंता यांना शिवसेना कार्यालयात बोलावुन तात्काळ विज पुरवठा सुरू करून देण्याचे कळविले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनिष दुर्गे, युवासेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी, शिवसेना नगर सेवक नामदेव हिचमी, शिवसेना विभागप्रमुख सलिम शेख, युवासेना तालुका समन्वयक प्रशांत तलांडे, युवासेना उपशहर प्रमुख निहाल कुंभारे, शाखा प्रमुख पवन कुळसंगे आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.