गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्यागोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन.

गडचिरोली, दि.01: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित गोंडी व माडीया भाषेतील क्रमिक पाठयपुस्तकांच्या भाषांतरीत पुस्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रकाशन केले. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

या पुस्तकांच्या प्रकाशनामागे आदिवासी विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेशी जोडून, संस्कृतीशी तसेच त्यांच्या जिवनाशी जोडून केली तर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षीत बदल होऊ शकतो असा उद्देश आहे. आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्राथमिक शिक्षणावर भर देणे आवश्यक असून विद्यार्थ्यांचे जीवन इथेच घडते, जीवनाला मार्ग मिळतो, मेंदूची वाढ याच काळात होते, जीवनाचा पाया इथेच रचला जातो व विद्यार्थ्यांचा नैसर्गिक शक्तीचा विकास करण्यासाठी योग्य वय म्हणजे प्राथमिक शिक्षण होय हा मागील हेतू आहे. म्हणून त्यांना समजेल अशा भाषेत शिकविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.