गडचिरोली प्रशासनाचा ‘गडचिरोली लाईव्ह’ हा अतिशय नाविण्यपूर्ण प्रकल्प – पालकमंत्री, एकनाथ शिंदे.
गडचिरोली,दि.01: गडचिरोली जिल्हयातील नागरीकांपर्यंत प्रशासनाच्या महत्वाच्या सूचना, हवामान व नैसर्गीक आपत्ती संदर्भातील आवश्यक सूचना लवकरात लवकर पोहचविण्यासाठी या एपचा उपयोग चांगला होईल असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मोबाईल अॅप आधारित “गडचिरोली लाईव्ह” रेडिओ ॲपची सुरुवात करण्यात आली. सूचना, संवाद व ज्ञानगंगा अशा विषयांचा समावेश गडचिरोली लाईव्ह या अॅपमध्ये असेल. नागरीकांसाठी आवश्यक अशा सूचना त्यांच्या पर्यंत पोचविणे, शासकिय योजनांची माहिती लोकांना पोहचविणे, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती तसेच नागरीकांशी संवाद साधणे व रेडिओच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे आणि या उद्देशाची पुर्तता व्हावी म्हणून गडचिरोली लाईव्ह या ॲपचा वापर जिल्हयातील नागरिकांनी करावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीवेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांसाठी विविध प्रशासनातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी आवारात दोन डीजीटल स्क्रीन बसविलेल्या आहेत त्याचे उद्घाटनही करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा