कसनसुर इंडेन ग्रामीण गॅस वितरक एजन्सी बंद करण्यासंबंधित शिवसेनातर्फे उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांना निवेदन.
एटापल्ली:- दि-०७/०३/२०२१ रोजी शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांना कसनसुर इंडेन ग्रामीण गॅस वितरक एजन्सी तात्काळ बंद करण्यासंबंधित निवेदन दिले.
कसनसूर इंडेन ग्रामीण गॅस वितरक यांनी वनसमिती मार्फत सन-२०२० साली एल.पी.जि. योजना राबविण्यात आली होती. सदर योजनेत लोकांची फसवणूक करून एटापल्ली क्षेत्रातील काही गावातील लोकांकडून २५ टक्के रक्कम म्हणजे १५५० रुपये गोळा करुन त्यांना सांगण्यात आले की १५ ते ३० दिवसात लाभार्थ्यांना एलपीजि गॅस मिळेल. सदर योजनेत अनेक आदिवासी जनतेकडुन १५५० रुपये घेण्यात आले. सदर प्रकरणाला २ वर्ष लोटून गेले तरी सुध्दा लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे अश्या गॅस एजन्सीला तात्काळ बंद करून लोकांचे पैसे परत मिळवून देऊन लोकांना न्याय देण्याकरीता शिवसेनातर्फे उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना शिवसेना तालुका प्रमुख मनिष दुर्गे, युवासेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी, शिवसेना नगर सेवक नामदेव हिचामी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा