अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी - भाग्यश्रीताई आत्राम यांची मागणी.

अहेरी (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून अहेरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कापणीस आलेले धान, कापूस तसेच इतर पिकांवर या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी अहेरी येथील तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना निवेदन देऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

तसेच भाग्यश्रीताई आत्राम यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा. पंचनामे तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याची काळजी प्रशासनाने घ्यावी.”

या निवेदनावेळी श्रीनिवास वीरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, अब्दुल रहमान, सुमित मोतकुरवार, ॲड. प्रभाकर डोंगरे, सुनील रत्नम, अनिल रत्नम, किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, सुधाकर सुंदीला, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, तुकाराम बोरकर, तुकाराम जुमडे, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.