अतिसंवेदनशिल पोलीस स्टेशन कवंडे येथे मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी जवानांशी साधला संवाद.
गडचिरोली – उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, श्रीमती रश्मि शुक्ला यांनी भेट देऊन जवानांच्या अभियान तयारीचे परीक्षण केले आणि प्रत्यक्ष संवाद साधला.
पोलीस महासंचालकांच्या भेटीदरम्यान पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-60 च्या जवानांसोबत चर्चा केली गेली. या संवादामध्ये प्रतिकूल आणि अतिसंवेदनशिल भागात पोलीस स्टेशनच्या स्थापनेसह त्याच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्यात आली आणि जवानांची कर्तृत्वाबद्दल विशेष प्रशंसा केली गेली.
या कार्यक्रमास मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये मा. डॉ. श्री. छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ), नागपूर, श्री. अजय कुमार शर्मा, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) व श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली यांचा समावेश होता.
पोलीस महासंचालकांनी जवानांच्या कार्यात उमेद आणि चिकाटी पाहून त्यांचे कौतुक केले आणि भविष्यात अशा अतिसंवेदनशिल भागांमध्ये सुरक्षिततेसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्याचे मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा