पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अतिसंवेदनशिल पोलीस स्टेशन कवंडे येथे मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी जवानांशी साधला संवाद.

इमेज
गडचिरोली – उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, श्रीमती रश्मि शुक्ला यांनी भेट देऊन जवानांच्या अभियान तयारीचे परीक्षण केले आणि प्रत्यक्ष संवाद साधला. पोलीस महासंचालकांच्या भेटीदरम्यान पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-60 च्या जवानांसोबत चर्चा केली गेली. या संवादामध्ये प्रतिकूल आणि अतिसंवेदनशिल भागात पोलीस स्टेशनच्या स्थापनेसह त्याच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्यात आली आणि जवानांची कर्तृत्वाबद्दल विशेष प्रशंसा केली गेली. या कार्यक्रमास मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये मा. डॉ. श्री. छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ), नागपूर, श्री. अजय कुमार शर्मा, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (...

एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटात शेकडो युवक- महिलांचा पक्ष प्रवेश.

इमेज
एटापल्ली (प्रतिनिधी) – “गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट हेच खरे पर्याय” असा विश्वास दाखवत एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी ग्रामपंचायत क्षेत्रातील शेकडो युवक व महिलांनी मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम केली. आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या उपक्रमासाठी श्री. उमेशजी दासरवार, मनीषजी दुर्गे व संजयजी चरडुके यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने संघटनात्मक पातळीवर जोरदार पायाभरणी केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कार्यक्रमाला सिनेट सदस्य आदरणीय तनुश्री ताई आत्राम, तालुकाध्यक्ष सांभा हिचामी, ज्येष्ठ नेते नसरू भाई शेख, दामा नरोटेजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रवेश केलेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे आहे गाव – वाघेझरी प्रवीण शेंडे, मनोज कोवासे, अंबादास कावळे, प्रकाश म...

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.

इमेज
गडचिरोली, (ता. अहेरी) – नागेपल्ली गावातील सार्वजनिक श्मशानभूमीवर अंतिम संस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, १५-२० वराह (डुक्कर) पालन करणारे अतिक्रमणकार यांनी श्मशानभूमीवर बेकायदेशीर कब्जा करून ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करू न देण्याचा प्रयत्न केला. अडवणुकीदरम्यान त्यांनी धमक्या देत शिवीगाळ केली आणि हातोडी, काठ्या तसेच तलवारीसारख्या घातक शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भीमराव विठ्ठल गुरनुले आणि आकाश गुरनुले गंभीर जखमी झाले आहे. तसेच प्रदीप ठाकरे, रोहित गुरनुले, श्रीहरि व दशरथ निकोडे यांना देखील मारहाण करण्यात आली. सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलविण्यात आले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, या श्मशानभूमीवरील अतिक्रमणाबाबत पूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र, अतिक्रमणकारांना पोलिस प्रशासनाची भीती नसल्याने त्यांनी पुन्हा कब्जा करून कायद्याचा सरळसरळ अनादर केला आहे...

अखेर मागणीला यश : चंद्रपूर बस डेपोतुन सुटणार चंद्रपूर - एटापली बस, भाकपा.

इमेज
एटापली तालुक्यातील नागरिकांना दिलासा. अखेर मागणीला यश. एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून मांडलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीकडे बस सुटावी  ही मागणी फक्त वाहतुकीपुरती नव्हती, तर ती हजारो लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित होती. आरोग्य उपचारासाठी चंद्रपूरला जाणाऱ्या शेकडो नागरिकांना दिवसभर तपासण्या, औषधोपचार आणि औपचारिकता पार पाडल्यानंतर परतण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसायचा. त्यामुळे वृद्धांना शहरात मुक्काम करावा लागे, महिलांना आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागे, तर आजारी रुग्णांना परक्या शहरात रात्री घालवावी लागे. ही अडचण केवळ खर्चिकच नव्हती, तर मानवी वेदनाही निर्माण करणारी होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने ही मागणी ठामपणे मांडली. भाकपा जिल्हा सहसचिव व AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सातत्यपूर्ण निवेदनं, आंदोलने आणि पाठपुरावा करून हा मुद्दा शासनदरबारी नेला. अखेर विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ गडचिरोली यांनी,लेखी पत्राद्वारे अधिकृत कळविले की ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीसाठी बससेव...

📍आता प्रत्येक ग्रामीण रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक.

इमेज
काटेकोरपणे नोंदणी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. गडचिरोली , (जिमाका) – ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची नोंद अद्ययावत करून त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी शासनाने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, वापरात असलेले पण गाव नकाशावर नोंद नसलेले रस्ते देखील यामध्ये समाविष्ट करून त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काटेकोर नोंदी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय असोले, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. 🔷️ रस्त्यांचे सर्वेक्षण आणि नोंदणी या उपक्रमांतर्गत ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेत पांदण रस्त्यांचे सर्वेक्षण ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने करून प्राथमिक यादी तयार केली जाईल...

सुरजागड–गट्टा रस्ता मृत्यूचा सापळा!

इमेज
अडेंगे–नेडर येथे एस.टी. बस अडकल्याने प्रवाशांचा थरकाप, जनतेचा संताप उसळला. एटापल्ली :  सुरजागड–गट्टा मार्ग पुन्हा एकदा मृत्यूच्या दाराशी घेऊन गेला. आज अडेंगे–नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात अडकली. बसमधील प्रवाशांचा जीव थरारला, मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. दररोज शेकडो प्रवासी या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करतात. खड्डेमय व धोकादायक स्थितीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून हा मार्ग प्रवाशांसाठी “मृत्यूचा सापळा” ठरू लागला आहे. भाकपाचे जिल्हा सहसचिव तथा AIYF चे राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले – “जनतेचा जीव धोक्यात टाकून सरकार सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज काढते, पण स्थानिकांसाठी सुरक्षित रस्ताही देऊ शकत नाही. हा सरळ सरळ जनतेच्या श्रम व जीवनावरचा अन्याय आहे. जनतेच्या जीवावर चालणारा हा विकास आम्ही मान्य करणार नाही.” ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, सरकार व लोकप्रतिनिधी रस्त्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दु...

जांबिया ग्रामपंचायत कार्यालय कायम बंद – ग्रामस्थांचा रोष, भाकपाकडून निवेदन.

इमेज
एटापल्ली (प्रतिनिधी) :   📅 एटापल्ली | जांबिया ग्रामपंचायत कार्यालयातील कारभार ठप्प झाल्याने गावातील शेकडो नागरिकांना शासकीय सेवांसाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवक व कर्मचारी कायम अनुपस्थित असल्यामुळे जन्म-मृत्यू दाखले, रेशनसंबंधित प्रमाणपत्रे, निवडणूक नोंदणी, शासकीय योजनांचे अर्ज, मनरेगा कामगारांची हजेरीपत्रके यांसारखी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली आहेत. ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत ठामपणे सांगितले की, “कर्मचारी उपस्थित नसतील तर ग्रामपंचायत कार्यालयाचा उपयोग काय?” प्रशासनाने या निष्काळजीपणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाकपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. ग्रामस्थांचे थेट उद्गार रामदास उसेंडी यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “ग्रामपंचायत कार्यालयात गेलो की अनेकदा कुलूपच लावलेले असते. एका प्रमाणपत्रासाठी आठवड्यात दोन-तीनदा फेऱ्या माराव्या लागतात. वेळेवर सेवा मिळत नसल्याने आम्ही वैतागलो आहोत.” तर हरिदास गावडे म्हणाले, “घरकुल व पाणी समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कार्यालयाकडे लक्षच नाही.” निवेदन गटविकास अधिकाऱ्यांकडे या गंभीर परिस्थिती...

आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयाच्या समस्यांवर माजी. सरपंच अज्जू पठाण यांचा आंदोलनाचा इशारा.

इमेज
आलापल्ली –  ग्रामपंचायत आलापल्ली येथे सुरू असलेल्या गंभीर समस्यांबाबत आज ग्रामविकास अधिकारी चाली गंजीवार यांना माजी सरपंच अज्जू पठाण यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात तेंदुपत्ता संकलन मजुरांचे थकित मानधन तत्काळ देण्यात यावे, गावातील नळयोजनेचा बंदोबस्त व चौकशी करण्यात यावी. तसेच पेसा अंतर्गत मागील तीन वर्षांतील निधीची पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशा ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की – 1. सन २०२४-२५ या हंगामातील तेंदुपत्ता संकलन मजुरांचे मेहनतिचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत. 2. आलापल्ली गावातील नळ योजना बंद पडली असून, यासंदर्भात चौकशी व खुलासा करण्यात यावा. 3. पेसा अंतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांतील शिल्लक निधी, मंजूर रक्कम व ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडावा. माजी सरपंच अज्जू पठाण यांनी इशारा दिला आहे की, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात ग्रामपंचायत कार्यालयाने तत्परता दाखवली नाही तर येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी अन्यायग्रस्त जनतेसह ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली समोर तीव्र...