आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयाच्या समस्यांवर माजी. सरपंच अज्जू पठाण यांचा आंदोलनाचा इशारा.
आलापल्ली – ग्रामपंचायत आलापल्ली येथे सुरू असलेल्या गंभीर समस्यांबाबत आज ग्रामविकास अधिकारी चाली गंजीवार यांना माजी सरपंच अज्जू पठाण यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात तेंदुपत्ता संकलन मजुरांचे थकित मानधन तत्काळ देण्यात यावे, गावातील नळयोजनेचा बंदोबस्त व चौकशी करण्यात यावी. तसेच पेसा अंतर्गत मागील तीन वर्षांतील निधीची पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशा ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत.
1. सन २०२४-२५ या हंगामातील तेंदुपत्ता संकलन मजुरांचे मेहनतिचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत.
2. आलापल्ली गावातील नळ योजना बंद पडली असून, यासंदर्भात चौकशी व खुलासा करण्यात यावा.
3. पेसा अंतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांतील शिल्लक निधी, मंजूर रक्कम व ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडावा.
माजी सरपंच अज्जू पठाण यांनी इशारा दिला आहे की, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात ग्रामपंचायत कार्यालयाने तत्परता दाखवली नाही तर येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी अन्यायग्रस्त जनतेसह ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली समोर तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल.
ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य वेळी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आक्रोशजन्य आंदोलन अनिवार्य होईल, असा स्पष्ट इशारा पठाण यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा