जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू.
गडचिरोली : - दि.17: राज्यात पुन्हा कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांचेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 16.05.2021 चे 00.01 वा. ते दिनांक 30.05.2021 चे 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक 16.04.2021 चे 00.01 वा. ते दिनांक 30.04.2021 चे 24.00 वाजे पावेतो या कालावध...