18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांच्या कोविड लसीकरणास जिल्ह्यात सुरुवात पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य.

गडचिरोली : - दि.01: दि. 01 मे पासून गडचिरोली जिल्ह्यातील 5 शासकीय आरोग्य संस्थामध्ये जिल्ह्यातील 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. सदर मोहिम ही पुर्णत: नि:शुल्क आहे. 

लसीकरणा करीता उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्था पुढील प्रमाणे आहेत. 
1) सामान्य रुग्णालय, गडचिरोली 
2)महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली 
3) पोलीस रुग्णालय, गडचिरोली 
4) प्रा.आ.केंद्र कोरेगांव, वडसा 
5) उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी

मोफत लसीकरणासाठी लसीकरण केन्द्रावर येण्यापुर्वी स्वत: पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

नोंदणी पुढीलप्रमाणे करावी. 
1) सर्वप्रथम selfregistration.cowin.gov.in या link ला open करुन त्यामध्ये आपला मोबाईल नंबर नोंदवावा. 
2) नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस द्वारा 6 अक्षरी OTP  येईल 
3) त्यानंतर screen वर OTP Verification चा page open होईल. 
4) सदर 6 अक्षरी  OTP नोंदवून OTP Verification करुन घ्यावे. 
5) त्यानंतर welcome screen open होईल. 
6) एक मोबाईल नंबरची पोर्टलला नोंदणी झाल्यानंतर पुन्हा 3 व्यक्तींची नोंदणी करता येईल. 
7) त्यानंतर Register Member  या बटणवर क्लिक करावे. 
8) त्यानंतर Registration for vaccination  या बटनवर क्लिक करुन विचारण्यात आलेली माहिती भरावी. 
9) त्यामध्ये फोटो ओळखपत्राचा उल्लेख करावा, फोटो ओळखपत्र हे आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ई. असावा. सदर फोटो ओळखपत्र हा लसीकरण केन्द्रावर पडताळला जाणार असल्याने लसीकरणास  जातांना ज्या फोटो ओळखपत्राचा उल्लेख केलेला आहे ते फोटो ओळखपत्र सोबत बाळगावे. 
10) त्यानंतर लसीकणाचे केन्द्र निवडावे व निवड केलेल्या केन्द्रावरच लसीकरणास प्रत्यक्ष हजर राहावे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणा संदर्भात आवश्यक सूचना पुढील प्रमाणे आहेत. 
1) 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम दि.01 मे 2021 पासून सुरु होत आहे. 
2) सद्यास्थितीत जिल्हामध्ये वरील 5 केन्द्रावर लसीकरण सुरु राहील.
3) लसीकरणाची वेळ दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राहील. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागातर्फ आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.