आज गडचिरोली जिल्ह्यात 490 कोरोनामुक्त,11 मृत्यूसह 372 नवीन कोरोना बाधित.

गडचिरोली : - दि.11: आज जिल्हयात 372 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 490 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25984 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 21777 वर पोहचली. तसेच सद्या 3639 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 568 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. 

आज 11 नवीन मृत्यूमध्ये ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 30 वर्षीय पुरुष, ता.अर्जुर्नी जि. गोंदिया येथील 53 वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील नवजात मुलगी, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय पुरुष, ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर  येथील 65 वर्षीय महिला, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 46 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.00 टक्के तर मृत्यू दर 2.19 टक्के झाला.
       
नवीन 372 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 93, अहेरी तालुक्यातील 50, आरमोरी 41, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 52, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 18, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 34, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 26 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. 

आज कोरोनामुक्त झालेल्या 490 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 188, अहेरी 32,  आरमोरी 35, भामरागड 21, चामोर्शी 45, धानोरा 19, एटापल्ली 12, मुलचेरा 13, सिरोंचा 45, कोरची 12, कुरखेडा 26 तसेच वडसा येथील 42 जणांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.