बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी.

गडचिरोली : - दि.03: गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडुन खरेदीस प्राधान्य द्या.बनावट/भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन पावतीसह खरेदी करा.पावतीवर बियाण्याचा संपुण तपशिल जसे पीक, वाण, संपुर्ण लॉट नंबर , बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपुर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमुद करावे . तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन / पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळची शंका दुर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद / मोहरबंद असल्याची खात्री करणे.बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहुन घ्या.कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.           

तसेच मार्गदर्शनासाठी 18002334000 या निशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, जिल्हयात जिल्हा पातळीवर तसेच तालुका पातळीवर भरारी पथके स्थापन केली असुन त्याद्वारे जिल्हयात नियंत्रण करण्यात येणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी कळविले  आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.