सिरोंचा वन विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाची पडताळणी करा - संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.

गडचिरोली : - जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सिरोंचा वनविभागाला विविध कामाकरीता दिलेल्या निधीतील कामात नियमबाह्यता व निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे, सदर कामाचा दर्जा तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करुन कामाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, सन 2020-21 मध्ये सिरोंचा वनविभागाला जिल्हा नियोजन समितीमार्फत कोट्यावधीचा निधी देण्यात आला. या निधीअंतर्गत खोदतळे, कलवट, बंधारे तसेच डीप सीसीटीसह इतर कामे केली जात आहेत. मात्र सुरु असलेली ही कामे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच सदर कामे शासनाच्या परिपत्रकाला डावलून नियमबाह्य सुरु असल्याचे म्हटले आहेत. 

त्यामुळे सदर कामांचे संपूर्ण निविदा प्रक्रियेचे दस्ताऐवज व कामाचा दर्जा तपासण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती गठित करुन पडताळणी करण्यात यावी व दोषी आढळणा-या संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी केली आहे. तसेच सदर कामाच्या दर्जाबाबत व निधीची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कामासंबंधीची देयके अदा करण्यात यावे, असेही ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.