१० ऑक्टोबरला मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद.

प्रभाकर डोंगरे- मुख्य संपादक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव व यासह १५ ठराव या गोलमेज परिषदेत मांडुन चर्चा करण्यात आले. 
याचबरोबर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा बुधवारी या परिषदेत देण्यात आले. तसेच सरकारने वेळेवर योग्य पाऊले उचलली नाहीत, तर याच परिषदेत ४८ खासदार आणि १८१ मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला.
या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणाची जबाबदारी थेट राज्य सरकारवर टाकुुन केंद्र सरकारला क्लीन चिट देण्यात आली . तसेच राज्यात करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगित देण्यात यावी व सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा ठरावही यावेळी करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापुरात गोलमेज परिषदेला राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.