पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गडचिरोली जिल्हा परिषदचे सदस्य श्री. विनोद लेनगुरे यांनी छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गावांना दिली भेट

इमेज
सेवा पवार : - उपसंपादक मौजा कनेली, चुटीनटोला, समलपुर, बोटेहुर, आलकन्हार, या गावांचा दौरा करून स्थानिक कर्मचाऱ्यां समक्ष विविध समस्यांचा व विकास कामांचा घेतला आढावा.     धानोरा तालुक्यातील गट्टा-पेंढरी  जिल्हा परिषद क्षेत्रातील महाराष्ट्र राज्याचे अगदी शेवटच्या टोकावर असलेले ही अतिशय दुर्गम असून विकासापासून कोसो दूर आहेत. त्या ठिकाणी येणं-जाण्याकरीता रस्ता नाही. छोट्या छोट्या नाल्यावर पुल नाही, त्यामुळे पावसाच्या काळामध्ये त्यांचा संपर्क तुटतो. गरोदर माता व आजारी असणाऱ्या व्यक्तीला उपचारा अभावी आपला प्राण गमवावे लागतो. अश्या प्रकारे सर्व गावकऱ्यांनी समस्या मांडले.   तसेच या दुर्गम भागामध्ये  अतिक्रमण धारक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, त्यांना वन पट्टे अजून पर्यंत मिळालेले नाही. परिणामी त्यांना शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहावे लागत आहे. बऱ्याचशा लोकांकडे आधार कार्ड, राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व इतर महसुली पुरावे नसल्याने त्यांना वन पट्टे मिळण्यास अडचण होत आहे, म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य श्री विनोद लेनगुरे व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री निवा...

लॉकडाऊनमुळे पाच वर्षाचा शिक्षण वाया जाणार, या भीतीने विद्यार्थिनीने केली विष प्राशन

इमेज
सेेेवा पवार : - उपसंंपादक मा. डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी गडचिरोली यांनी अहेरी उप जिल्हा रुग्णालयात भेट देऊन स्वतः केले विद्यार्थिनीची तपासणी. मा.डाँ .नामदेवरावजी ऊसेंडी माजी आमदार, जिल्हाअध्यक्ष कांँग्रेस गडचिरोली हे 69-अहेरी विधानसभा क्षेञात पक्ष सघंटना मजबुत करण्यासाठी एक दिवसाचा दौऱ्यावर मौजा-आलापल्ली येथे आले असता अहेरी तालुक्यातील मौजा-नवेगाव येथील कांँग्रेसचे कार्यकर्ते लोहबंडे यांची मुलगी या लाँकडाऊन मुळे विचलित झाली, तिच्या मनात आपले वर्ष वाया जाणार व आपल्या आई-वडिलांंनी ऐवढे कष्ट करुण माझ्या शिक्षणावर पुष्कळ रु.खर्च केले,हे विचार करुण त्या मुलीने विष प्राषण केले होते, परंतु तिला तात्काळ अहेरी उप-रुग्णालय येथे घेवुन आले त्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले, तरी त्या मुलीला पाहण्यासाठी मा.नामदेवरावजी ऊसेंडी हे उप-रुग्णालय अहेरी येथे भेट दिली व तेथील बहुतेक रुग्णाची त्यांनी स्वःता तपासणी केले व तेथील डाँ.हकीम याच्याबरोबर रुग्णाबाबत चर्चा ही केले. तसेच उप-जिल्हा रुग्णालयचे मुख्य डाँ .कन्ना मडावी यांचाशी रुग्णालयाबाबत चर्चा ही केली. त्या...

आलापल्ली व अहेरी येथील जनता कर्फ्युला व्यापारी संघटनाकडुन उत्तम प्रतिसाद

इमेज
सेवा वाकडॊतपवार- उपसंपादक गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यांतील आलापल्ली व अहेरी या ठिकाणी व्यापारी संघटना कडुन सात दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आले आहे. कोविड 19 चा वाढत्या  प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्यापारी संघटना आक्रमक झाले आहे. आलापल्ली व अहेरी हे मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेतुन इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवाचा  पुरवठा होतो. त्यामुळे आलापल्ली व अहेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणांत नागरिक ये-जा करतात. व्यापारी संघटनांनी हे लक्षात घेऊन कोविड 19 चा प्रभाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु लावण्यात आले आणि अत्यावश्यक सेवा वगळुन सर्व बाजारपेठ बंद करण्यात आले. नागरिकांनी जनता कर्फ्युला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे.

जिल्हयात 55 जण कोरानामुक्त, तर नवीन 44 कोरोना बाधित

इमेज
संतोष अग्रवाल : - कार्यकारी संपादक गडचिरोली दि.26 सप्टेंबर : एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 55 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली मधील 31 जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात अहेरी 1, आरमोरी 3, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 3, मुलचेरा 3, सिरोंचा 1 व वडसा 7 जणांचा समावेश आहे. तर नवीन 44 बाधितांमध्ये गडचिरोली 13, अहेरी 6, आरमोरी 9, चामोर्शी 7, कोरची 3, कुरखेडा 2 व वडसा 3 जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 612 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2419 रूग्णांपैकी 1791 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट येथील 30 वर्षीय तरूणाचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. आजच्या नवीन 44 कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली 13 यात नवेगाव 3, सर्वोदया वार्ड 2, कॅम्प एरिया 2, आशिर्वादनगर 1, कारगिल चौक 1, मार्काबेादी 1, आयोध्यानगर 2, चामोर्शी रस्ता 2 रूग्णांचा समावेश आहे. अहेरी 6 यात शहरातील 4 तर महागाव व आलापल्ली एक-एक, आरमोरी 9 यात शहरातील 8 तर सायगाव 1. चामोर्शी 7 यात वाघधरा 3, श...

आलापल्ली व अहेरी शहरात २८ सप्टेंबर ते ४ आक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यु

इमेज
संतोष अग्रवाल- कार्यकारी संपादक     कोरोनाचा वाढ़त्या प्रभावामुडे  आलापल्ली व अहेरी शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांची एक बैठक काल संध्याकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत  आलापल्ली व अहेरी शहरात सोमवार ते रविवार ( 28 सप्टेंबर ते 4 आक्टोबर ) ७ दिवसा पर्यन्त कडकडीत बंद ठेवण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन चर्चा करून ह्या कडकडीत बंदच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.         त्यानंतर या निर्णयाची माहिती तहसीलदार,अहेरी, मुख्याधिकारी आणि पोलिस निरीक्षक,अहेरी यांना देण्यात आले. कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस दक्षिण गडचिरोलीतही अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने व्यापारी बांधवानी हे पाऊल उचलले आहे. तेव्हा सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हाहन अहेरी व आलापल्ली व्यापारी संघाने केले आहे.

आलापल्ली येथे 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' उपक्रमाचे प्रारंभ

इमेज
सेेेवा पवार- उपसंंपादक माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी शुभारंभ केले स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले *अहेरी:*- कोरोना या जीवघेणी व संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी राज्यशासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे उपक्रम राबवित असून आलापल्ली येथे शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले.      यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी , अनेक कुटुंबियांच्या घरी भेटी देऊन अक्षरशः थरमल स्कॅनरनी तापमान मोजले व पल्स आक्सीमीटरनेही तपासणी केले आणि प्रत्येकांनी मास्क लावून, सॅनिटायझरचा वापर करावे व गर्दी टाळावे असा सल्ला देऊन स्वतःची व कुटुंबाची योग्य काळजी घेण्याचे यावेळी आवाहन केले व प्रत्येकांनी 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' या उपक्रमात सहभागी होऊन विशेषतः कोरोना व आरोग्याची योग्य काळजी घेण्याचेही मौल्लीक सल्ला भाग्यश्री ताई आत्राम यांनी दिले. तद्नंतर तालुका  आरोग्य अधिकारी किरण वानखेडे व त्यांच्या चम्मूनी प्रत्येक घरात आरोग्याची तपासणी करण्याची मोहीमेला सुरुवा...

१० ऑक्टोबरला मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद.

इमेज
प्रभाकर डोंगरे- मुख्य संपादक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव व यासह १५ ठराव या गोलमेज परिषदेत मांडुन चर्चा करण्यात आले.  याचबरोबर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा बुधवारी या परिषदेत देण्यात आले. तसेच सरकारने वेळेवर योग्य पाऊले उचलली नाहीत, तर याच परिषदेत ४८ खासदार आणि १८१ मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला. या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणाची जबाबदारी थेट राज्य सरकारवर टाकुुन केंद्र सरकारला क्लीन चिट देण्यात आली . तसेच राज्यात करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगित देण्यात यावी व सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा ठरावही यावेळी करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापुरात गोलमेज परिषदेला राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.